पिंपळे गुरव, ता. १६ ः संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३९ व्या पुण्यतिथीनिमित्त पांचाळ सोनार समाज आणि नवी सांगवीतील सांगवीकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
काळेवाडी येथील ज्ञानदा भजनी मंडळाच्या अध्यक्षा लता दीक्षित व त्यांचे सहकारी यांनी भजन सेवा दिली. शंकरगिरी महाराज (आळंदी देवाची) यांनी हार्मोनियमवर; तर दत्ता सूर्यवंशी यांनी पखवाजावर त्यांना सुरेल साथ दिली. पाऊणे बारा वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात नरहरी महाराज यांची आरती करण्यात आली. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सौरभ वेदपाठक, संजय मराठे, प्रकाश दीक्षित, रमेश धर्माधिकारी, दत्तात्रेय पोतदार, संजय महामुनी, रमण क्षीरसागर, श्रीधर पंडित, प्रज्वल पोतदार, शरद पाचणकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर वेदपाठक परिवार यांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.