पिंपळे गुरव, ता. १६ ः पिंपळे गुरव येथील भाऊनगर परिसरात विश्वकर्मा मंदिराजवळ दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास प्लायवुड फर्निचर, स्क्रॅप तसेच मंडप डेकोरेशन साहित्य साठवून ठेवलेल्या चार गोदामांना भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दलाच्या पिंपरी, राहटणी, भोसरी आणि चोविसावाडी येथील केंद्रांमधून चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, परिसरातील अरुंद अंतर्गत रस्ते व बेशिस्त वाहन पार्किंगमुळे अग्निशामक दलाच्या बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले.
आगीची गंभीरता लक्षात घेऊन महावितरणने तत्काळ वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आमदार शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशामक दलाचे जवान विजय घुगे, गौतम इंगवले, शहाजी कोपनर व विशाल फडतरे यांच्या पथकाने अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग लवकर आटोक्यात आणता आली. व्यावसायिकांनी आपल्या ठिकाणी अग्निप्रतिबंधात्मक उपकरणे बसवून नियमित फायर ऑडिट करणे आवश्यक आहे.
- शंकर जगताप, आमदार, चिंचवड
दुर्घटनेची माहिती मिळताच आम्ही तत्काळ संबंधित ठिकाणचा वीजपुरवठा बंद केला. तसेच मीटरच्या केबल्स तातडीने तोडण्यात आल्या. जेणेकरून पुढील धोका टाळता येईल.
- संतोष पाचरस, सहाय्यक अभियंता, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.