पिंपरी-चिंचवड

ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनचा महिला दिन उत्साहात साजरा

CD

पिंपळे सौदागर, ता.१६ ः पिंपळे सौदागर येथील ‘ऑल सीनियर सिटीझन असोसिएशन’च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात करण्यात आला.
संसारामध्ये पुरुषांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाला तर महिलांना समाजात प्रगती करणे अधिक सोपे होते, असे प्रतिपादन पी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या प्रा. डॉ. धनश्री सोनवणे यांनी केले. स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी नगरसेविका डॉ. कुंदा भिसे, अनिता काटे, लेखिका व कवयित्री गीतांजली जोशी, गायिका भारती न्यायाधीश, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरोळ तसेच डॉ. धनश्री सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप काटे, ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार आणि सचिव सखाराम ढाकणे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक शकुंतला शिंदे यांनी केले. विवेकानंद लिगाडे यांनी मनोगत व्यक्त केले, तर विजया तारे यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. रेखा येळंमकर यांनी कविता सादर केली, तर सुरेखा पाटील यांनी महिला गीत केले.
सूत्रसंचालन निर्मला कासार यांनी केले तर भामिनी महाले यांनी आभार मानले. शोभा राजगुरे, विमल मोंढेकर, अशोक येळंमकर, सुभाष विधाते, रमेश चांडगे, अशोक कलाल आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

Mumbai: गाड्यांवरील लुकलुकणारे दिवे हटवले, वादंगानंतर पालिका प्रशासनाची तातडीची कारवाई

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Latest Marathi Update : एमआयडीसीविरोधात मावळमध्ये संताप; स्मशानभूमीसाठी नागरिकांचा तहसील कार्यालयावर प्रेतयात्रा मोर्चा

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

SCROLL FOR NEXT