पिंपरी-चिंचवड

फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबने तारामती शिखर केले सर

CD

पिंपरी, ता. २ : फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबने ४०वे ट्रेक २७ व २८ जानेवारी रोजी हरिश्चंद्रगडावरील तारामती शिखर सर करून पूर्ण केले. या ट्रेकमध्ये ३३ लहान-मोठ्या अबालवृद्ध सदस्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी ऋत्वी हिंगणे या पाच वर्षाच्या तसेच, दूर्वा विसपुते या नऊ वर्षाच्या बाल विरंगणेने तारामती शिखर सर केले.

ऋत्वीच्या या यशामध्ये तिची आई सारिका हिंगणे खंबीरपणे उभी होत्या. विसवास सोहनी या ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकानेही तारामती शिखर सर केले. शशिकांत कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, अलका कांबळे, शंकर राणे, श्रीकांत कदम, मधुकर देवकर, साईनाथ उदगीर, रावसाहेब कडुस, शरद चव्हाण व सुधाकर मकासरे या ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांना लाजवेल अशा रीतीने कामगिरी करून ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला.

अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील पाचनई गावामधून ठीक सकाळी ट्रेकिंगला सुरुवात झाली. फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करून ट्रेक व सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे व शून्य अपघाताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्याच्या सूचना दिल्या. जय भवानी, जय शिवाजी या घोषणेचा निनाद करून ट्रेकिंगला सुरुवात झाली. मोहिमेचे ट्रेक लीडर म्हणून जयसिंग कांबळे, कालिदास सूर्यवंशी, सुहास आढाव व लहू तावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; नवविवाहित महिलेने रक्षाबंधनादिवशीच संपविले जीवन

Latest Marathi News Updates : धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाच्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर चावडी बैठका

Dadar : माझ्या कारवर कबुतरांना खाद्य देतोय, सरकार-न्यायालयाला काय प्रॉब्लेम; संकलेचावर गुन्हा, गाडी जप्त

Satish Bhosale Bail: Suresh dhas यांचा कार्यकर्ता खोक्या खोक्याला अखेर जामीन मंजूर | Sakal News

'त्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी शेवटची इच्छा आहे'; फेसबुकवर व्हिडिओ करत तरुणानं संपवलं जीवन, आंब्याच्या झाडाखाली आला अन्...

SCROLL FOR NEXT