पिंपरी-चिंचवड

भोसरीत महाशिवरात्रीनिमित्त १२ पासून कीर्तन महोत्सव

CD

पिंपरी, ता. ११ : महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन क्रीडांगणावर १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्री सप्ताह आयोजित केला आहे. सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ कीर्तन सोळा रंगणार आहे. यासाठी पठारे-लांडगे तालीम मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोजेश्वर मित्र मंडळ, माळी-आळी मित्र मंडळ, संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय- तुकोबाराय प्रतिष्ठान, नामस्मरण भजनी मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री सावता माळी महाराज प्रतिष्ठान, समस्थ ग्रामस्थ भोसरी विधानसभा मतदार संघ यांनी पुढाकार घेतला आहे. शहराचे प्रथम महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाशिवरात्री सप्ताह होणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून गुरूवर्य भोसरीकर माऊली यांचे स्मरण करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार कीर्तनाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. भोसरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या महाशिवरात्री सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मान्यवरांची कीर्तनसेवा
पुरुषोत्तम महाराज पाटील, बापूसाहेब महाराज जावळीकर, शंकर महाराज शेवाळे, चंद्रकांत महाराज वांजळे, माऊली महाराज कदम, प्रमोद महाराज जगताप यांची कीर्तन ऐकायला मिळणार आहे. तसेच, महाशिवरात्रीला संजय महाराज पायगुडे आणि काल्याच्या कीर्तनात श्रीकांत महाराज गागरे सेवा करणार आहेत. काल्याचे कीर्तनामध्ये हिराबाई किसनराव लांडगे, रामचंद्र बाबूराव लांडगे आणि रमेश विठोबा लांडे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब लांडगे आणि नंदकुमार लांडे अन्नदान करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT