पिंपरी-चिंचवड

कारभाराच्या चौकशीसाठी समिती

CD

देहू, ता. १ ः देहू नगर पंचायतीच्या स्थापनेपासून झालेल्या विविध कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नगर प्रशासन विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी दिले आहेत. देहूतील जनजागृती सामाजिक मंचच्या वतीने विविध कामांच्या संदर्भात तक्रारी अर्ज करण्यात आले होते.
देहू ग्रामपंचायतीचे ८ डिंसेबर २०२० ला नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतरापैकी १४ उमेदवार निवडून आले. दोन अपक्ष आणि एक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला. मात्र, या तिघांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नगर पंचायतीमध्ये एकहाती राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. नगर पंचायतीमध्ये विविध विकास कामे झपाट्याने सुरू झाली. या कामावर मंचचे अध्यक्ष प्रकाश काळोखे यांनी विभागीय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरप्रशासन विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी सहा मार्चला चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा विभागाचे सहायक आयुक्त संदीप ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यात सहायक आयुक्त नगर परिषद शाखेच्या प्राची कचरे, लेखापाल गौरव भट्टड, प्रशासकीय अधिकारी स्वाती रेके, स्थापत्य अभियंता विशाल मुळे हे सदस्य आहेत. एक महिन्याच्या आत विविध कामांच्या केलेल्या तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधला. मात्र तो होऊ शकला नाही.

या आहेत तक्रारी
- नगरपंचायतीची पहिली सभा मार्च २०२२ मध्ये घेण्यात आली. या सभेत ४८ विषयांवर आणि दुसरी सभा एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आली. यात ३८ विषयांना मंजुरी देण्यात आली. यात कोट्यवधी रुपयांची कामे करण्याचे निर्णय झाले. या कामांची माहिती देहूतील रहिवाशांना देण्यात आली. तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे प्रकाश काळोखे यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे
- कार्यालयातील अधिकारी कामाच्या वेळेत उपलब्ध नसतात. तसेच बाहेर गेल्याचे हालचाल रजिस्ट्ररला नोंद नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना कामाच्या बाबतीत त्रास होत आहे
- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत प्रसाद विक्रेत्यांसाठी गाळे बांधण्यात आले. मात्र, या गाळ्यांचा ताबा नगरपंचायतीने घेतला. या ठिकाणी लाखो रुपये खर्च केले. पार्किंगसाठी असलेल्या जागेतही बांधकाम केले. या ठिकाणी झालेल्या कामांच्या निविदांची चौकशी करण्याची मागणी केली आहे
- नगर पंचायतीकडे रस्ते वर्ग नसताना रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या. काही खासगी जागेवर रस्ते बनविण्यात आले. सरकारी गायरानात जागेचे हस्तांतरण न करता निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
- रुग्णवाहिकेची चौकशी करण्यात यावी


‘‘चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जे काय झाले ते समोर आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच. मी पूर्ण माहिती घेते आहे.
- स्मिता चव्हाण, नगराध्यक्ष, देहू नगर पंचायत

‘‘देहूत सुरू असलेल्या प्रकरणाची माहिती मी वारंवार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना देत होतो. त्याबाबत बैठक झाली. मात्र, कोण्हीही लक्ष दिले नाही. कामे नियमबाह्य झाली आहेत. त्याची चौकशी करायला पाहिजे. त्यातून जे सत्य बाहेर येईल. दोषींवर कारवाई व्हायला हवी.’’
- प्रकाश काळोखे, तक्रारदार देहू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT