पिंपरी-चिंचवड

जेजुरीत गुढीपाडव्याला अश्‍व अर्पण सोहळा

CD

पिंपरी, ता. २० : श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या अश्‍वाचे मानकरी व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे व पानसरे कुटुंबीय, जेजुरी ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांच्यावतीने श्री खंडोबा देवास ‘पंचकल्याणी अश्‍व’ अर्पण सोहळा येत्या बुधवारी (ता. २२) गुढीपाडव्याला जेजुरी येथे होणार आहे. हा
अश्‍व पाहण्यासाठी भाविकांनी सोमवारी (ता. २०) हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स (एचए) कॉलनीत गर्दी केली होती.
पानसरे कुटुंबीय एचए कॉलनीत राहत असल्याने या अश्‍वाचे आज सकाळी आगमन झाले. यावेळी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक जितेंद ननावरे, माजी नगरसेविका अमिना पानसरे आदी उपस्थित होते.
हा पंचकल्याणी अश्‍व अकलूजवरून आणला आहे. उद्या (मंगळवारी) दुपारी एकला पूजा करून तो जेजुरीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात काही काळ अश्‍व थांबणार आहे. त्यानंतर जेजुरीकडे रवाना होणार आहे. त्यानंतर पाडव्यादिवशी अश्‍वाची विधीवत पूजा करून श्री खंडोबा देवाच्या सेवेत अर्पण करणार असल्याचे महंमदभाई पानसरे यांनी सांगितले.

‘‘सुमारे १०० वर्षांपेक्षा जादा वर्षांपासून ही सेवा आमच्या घराण्याकडे आहे. सामाजिक विचारातून दिलेला हा अश्‍व असतो. माझ्या हयातीत हा सहावा अश्‍व श्री खंडोबा देवाला अर्पण करत आहोत.
- महंमदभाई पानसरे, श्री खंडोबा अश्‍वाचे मानकरी.
फोटो- 31714

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT