पिंपरी-चिंचवड

वाहन खरेदीही ‘वेगात’

CD

पिंपरी ः गुढीपाडव्याच्या दिवशी यंदाही नागरिकांना वाहने घरी घेऊन जाता येणार आहेत. खरेदीचा मुहूर्त साधत तीन हजार ७९७ वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केली आहे. वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद दिसून आला. शहरात विविध कंपन्यांची चार चाकी व दुचाकी विक्रीची शोरूम आहेत. दुचाकी विक्री करणाऱ्या शोरूममध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. तीच गर्दी चारचाकी वाहन विक्री करणाऱ्या शोरूममध्ये होती. गुढीपाडव्यानिमित्ताने १३ मार्चपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नागरिकांनी नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. २१ मार्चपर्यंत तीन हजार ७९७ वाहनांनी नोंदणी केली आहे. यात चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. गेल्यावर्षी चार हजार ३२२ वाहनांनी नोंदणी केली होती, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ऑफर
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात देखील एलडी, फ्रिज, मोबाईल, वॉशिंग मशीनसह अन्य इलेक्टॉनिक्स वस्तू खरेदीसाठी चांगली गर्दी होत आहे. दिवसभरात मोठी उलाढाल होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. चिंचवड कस्तुरी मार्केटमधील सूर्या इलेक्ट्रॉनिक्सने काही ऑफर जाहीर केल्या आहेत. विविध ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ऑनलाइन किमतीपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे. यामध्ये एलईडी टीव्ही वॉशिंग मशिन, फ्रिज, मिक्सर, मोबाईल फोन, लॅपटॉप आदी वस्तूचा समावेश आहे.कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर त्याची डिलिव्हरी त्याच दिवशी मिळेल. सूर्या इलेक्ट्रॉनिकमध्ये सर्व वस्तूच्या खरेदीवर विविध नामांकित बँकेचे कॅशबॅक आणि सुलभ हप्त्याची सुविधा आहे, अशी माहिती सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष रमेश चौधरी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT