पिंपरी-चिंचवड

लाचप्रकरणातील लिपिकाला अटक पाणीपुरवठा विभागातील प्रकरण; आजपर्यंत महापालिकेत ३३ कारवाया

CD

पिंपरी, ता. २२ ः पाणीपुरवठा विभागांतर्गत देखभाल- दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिकास अटक केली आहे. महापालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची ३३ वी कारवाई आहे.
महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी कारवाई केली होती. त्यात दिलीप भावशिंग आडे (वय ५१) याला ठेकेदाराकडून लाच घेताना ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करून अटक केली. निविदेनुसार काम मिळालेले असतानाही कामाच्या वर्क ऑर्डरची फाइल तयार करण्यासाठी एक लाख पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची आणि तडजोडीअंती एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आडेवर आहे.

पहिली घटना १९९७ मध्ये
महापालिकेत लाच प्रकरणी छापा पडल्याची पहिली घटना १९९७ मध्ये घडली. त्या वेळी चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथे सदनिकेची नोंदणी करण्यासाठी ३०० रुपयांची लाच घेताना तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला अटक झाली होती. आतापर्यंत लाचेच्या ३३ घटना घडल्या आहेत.

तीन वर्षात तीन घटना
महापालिकेत २०२१ मध्ये स्थायी समिती अध्यक्षांसह त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. ती तक्रार एका ठेकेदाराने केली होती. गेल्या वर्षी नगररचना विभागातील सर्व्हेअरला लाच प्रकरणी अटक केली होती. आता पाणीपुरवठा विभागात कारवाई झाली.

पाणी पुरवठा विभागात एसीबीची झालेली कारवाई चांगली आहे. लाचखोरीची प्रकरणे होऊ नयेत. मात्र, अशा कारवायांमुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत होते. लाच मागणाऱ्यांची तक्रार नागरिकांनी करायला हवी. एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढील महिन्यात बदल्या केल्या जातील
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT