पिंपरी-चिंचवड

पोलिस आयुक्तालय स्वतःच्या जागेत कधी? पाठपुराव्याला यश मिळेना ः गेल्या पाच वर्षापासून भाड्याच्या इमारतीत कामकाज

CD

पिंपरी, ता. २६ : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन होऊन, पाच वर्षे उलटली. मात्र, अद्यापही आयुक्तालय व मुख्यालयाला स्वतःची हक्काची जागा उपलब्ध झालेली नाही. प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करूनही जागा उपलब्ध होत नसल्याने भाड्याच्या इमारतीतच कामकाज सुरु आहे.
पुणे शहर आयुक्तालयातील दहा तर ग्रामीण हद्दीतील पाच पोलिस ठाणे मिळून २५ मे २०१८ ला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाली. १५ ऑगस्ट २०१८ ला चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली. मात्र, ही जागा अपुरी पडत असल्याने १ जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील शाळेची दुमजली इमारत घेण्यात आली. ही जागाही अपुरी पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनासह इतर विभागाच्या कार्यालयासाठीही पुरेशी जागा नाही. यामुळे चिखली येथील जागेची मागणी केली असून येथे प्रशस्त इमारत झाल्यास गैरसोय दूर होणार आहे. यासाठीचा प्रस्तावही पाठवला आहे. मात्र, तो अद्यापही विविध विभागांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

अशीच स्थिती मुख्यालयाची आहे. मुख्यालय व परेड ग्राऊंडसाठी देहूतील विठ्ठलनगर येथील जागेची मागणी केली आहे. मात्र, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. सध्या निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळा येथे मुख्यालय असून, येथे मैदानही पुरेसे नाही. प्रशस्त मैदान नसल्याने भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीसाठी वानवडी येथे जावे लागते. तसेच परेडसह खेळण्यासाठीही मैदान उपलब्ध नाही. बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आदींचीही आवश्यकता आहे.
----------------------------------------------
सध्याचे आयुक्तालय

आयुक्तालयासाठी चिंचवड प्रेमलोक पार्क येथील सर्व्हे नंबर १६५ व १६६ मधील महात्मा ज्योतिबा फुले (इंग्लिश मीडियम स्कूल) ची इमारत भाड्याने घेतली. ४४२७. ५० भूखंडाचे क्षेत्रफळ असून, इमारत बांधकाम क्षेत्रफळ २२०५. १३ चौरस मीटर आहे. ही जागा ६ जानेवारी २०१८ ला ताब्यात दिली आहे.
------------
सध्याचे मुख्यालय
निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळा इमारत व मैदान मुख्यालयासाठी घेण्यात आले. इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ६७६. १७ चौरस मीटर असून मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ ३११८. ३४ चौरस मीटर आहे.
----------------------

* सद्यःस्थिती
आयुक्तालयासाठी चिखली गट क्रमांक ५३९ येथे ३. ३९ हेक्टर जागेची मागणी केली असून, तसा प्रस्तावही पाठवला आहे. याबाबत नगर विकास विभागाने पीएमआरडीए कडून अभिप्राय मागवला आहे. ही प्रक्रिया पार पडल्यास या जागेचा मार्ग मोकळा होईल.
-------------

मुख्यालयासाठी देहूतील विठ्ठलनगर येथील गट क्रमांक ९७ येथील २० हेक्टर जागेची मागणी केली असून, प्रस्तावही पाठवला आहे. या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अपर तहसील पिंपरी-चिंचवड यांच्याकडून अभिप्राय मागवला असून, हा अभिप्राय जाणे बाकी आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे फाइल गेल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे जाईल. येथे तपासणी होऊन पुढील मंजुरीसाठी मंत्रालयात जाईल.
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT