पिंपरी-चिंचवड

सिद्धेश्वर स्वामींच्या विचारांनी जीवनात परिवर्तन

CD

पिंपरी, ता.२८ ः ‘‘सिद्धेश्वर स्वामींनी दिलेल्या अनेक विचारांपैकी एखादा विचार आत्मसात केल्यास जीवनात परिवर्तन घडेल. त्याचे आचरण करणे म्हणजेच गुरुनमन केल्याचे सार्थकी लागेल.’’, असे उद्‍गार कर्नाटक येथील ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख पूज्य बसवलिंग महास्वामी यांनी काढले.
बसव सेवा संघाच्यावतीने, भोसरी येथे श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या स्मरणार्थ आयोजित गुरू नमन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी अमृतानंद स्वामी, हर्षानंद स्वामी, श्रध्दानंद स्वामी, आत्माराम स्वामी, ईश प्रसाद स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, डॉ. डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री, रा.स्व.संघाचे प्रांतीय सदस्य हेमंत हरहरे, उद्योजक एस.बी. पाटील, स्वागताध्यक्ष प्रा.शिवलिंग ढवळेश्वर, अण्णाराय बिराजदार, बसव सेवा संघाचे अध्यक्ष राम नाईक, उपाध्यक्ष शंकरगौडा हादिमनी, सचिव विश्वनाथ शेलार आदी उपस्थित होते.
बसवलिंग महास्वामी म्हणाले,‘‘गौतम बुद्धांमध्ये असलेली शांती, महावीरामध्ये असलेली अहिंसा, महात्मा बसवेश्वरांमधील बुद्धी या सर्व गुणांची बेरीज म्हणजेच श्री सिद्धेश्वर महाराज होय. सिद्धेश्वर स्वामींनी आकाशातील नक्षत्र होऊन जगाला प्रकाश दिला. आपण ग्रहज्योती होऊन समाजाला प्रकाशित केले; तर जीवन समृद्ध होईल.’’
नाटेकर म्हणाले, ‘‘गुरूंचे नमन करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. आश्रमात जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चिकाटीने अभ्यासक करत रहा, हा गुरुमंत्र स्वामींकडून मिळाला. कर्म करीत रहावे फळ आपोआप मिळते. स्वामींच्या या उपदेशात्मक सल्ल्यानुसार मी अथक परिश्रम केले. मला त्यांच्या या उपदेशाची अनुभूती मिळाली.’’
डॉ.पी.डी.पाटील म्हणाले,‘‘महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. सिद्धेश्वर स्वामी हे ज्ञानाचे प्रतीक होते. त्यांच्याकडून समाजाला ज्ञान प्राप्त झाले.’’
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार साळुंखे, शिवण्णा नरुणी, आनंद जक्कनवर, अजय जाधव, युवराज कनवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT