पिंपरी-चिंचवड

पोलिस ठाण्यातील मनुष्यबळ वाढले नव्याने भरती झालेल्या महिला पोलिसांची नेमणूक

CD

पिंपरी, ता. ४ : पोलिस दलात भरती झाल्यानंतर पोलिस शिपाई पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला पोलिस अंमलदारांची विविध पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली. यामुळे पोलिस ठाण्यातील मनुष्यबळ वाढले आहे.

पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून १५ ऑगस्ट २०१८ ला स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाले. ग्रामीण व शहरी भाग तसेच औद्योगिक क्षेत्र, आयटी हब, तीर्थस्थळे आहेत. व्हीआयपी दौरे, विविध कार्यक्रमदेखील सुरु असतात. मात्र, मनुष्यबळाची कमतरता असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मागील वर्षी शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील पात्र उमेदवारांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना नेमणुकीची प्रतीक्षा होती. दरम्यान, सोमवारी २०९ महिला अंमलदारांची विविध पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातील मनुष्यबळ वाढले आहे. या अगोदरही नव्याने भरती झालेल्यांची काही ठाण्यात नेमणूक केलेली आहे.

दरम्यान, सध्या २१६ शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सुरु आहे. ही पूर्ण झाल्यानंतर आणखी कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.

---------------
पोलिस ठाणे व नेमणूक केलेल्या अंमलदारांची संख्या

पिंपरी १६ , चिंचवड ८, भोसरी २२, भोसरी एमआयडीसी १०, दिघी १०, आळंदी ११, चाकण ८, म्हाळुंगे १८, हिंजवडी १३, वाकड १३, देहूरोड १२, तळेगाव एमआयडीसी २४, सांगवी ११, चिखली ११, रावेत ८, शिरगाव १०,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT