पिंपरी-चिंचवड

बंद घर, चोरट्यांचा घोर!

CD

पिंपरी, ता. २३ : शाळांना सुट्या सुरू झाल्याने अनेकांनी गावी अथवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. कुटुंबासह बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असतात. यामुळे घरफोडी, चोरी होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी...

ती घरे टार्गेट
सुट्टीत शहरासह उपनगरातील अनेक घरे काही दिवसांसाठी बंद असतात. यामुळे परिसरात रहिवाशांची वर्दळही कमी असते. चोरटे याच संधीची वाट पाहून सलग काही दिवस बंद असलेल्या घरांना टार्गेट करतात. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतल्यास किमती ऐवज सुरक्षित राहू शकतो. यासाठी पोलिसांकडूनही जनजागृती सुरू आहे.

मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून राज्याच्या विविध भागासह राज्याबाहेरूनही अनेकजण कामानिमित्त शहरात वास्तव्यास आलेले आहेत. अनेकांना लवकर गावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांना सुट्या लागण्याची वाट पाहत असतात. सुट्या लागताच गावाला जाण्याची ओढ लागते. घर बंद करून गावी गेल्यानंतर चोरटे डाव साधतात.

शेजाऱ्यांशी भांडण आहे म्हणून ...
मागील आठवड्यात भोसरी परिसरात एक भरदिवसा घरफोडीची घटना घडली. चोरटे घर फोडत असताना शेजारील घरातील एक तरुणी हा सर्व प्रकार पाहत होती. मात्र, चोरी होत असलेल्या घरातील व्यक्तींशी त्यांचे भांडण असल्याने तरुणीने याबाबत कोणालाही सांगितले नाही. पोलिसांनाही कल्पना दिली नाही. दरम्यान, चोरटा ऐवज लुटून पसार झाला.

ही घ्या काळजी
- घरातील किमती वस्तू, रोकड बँकेत लॉकरमध्ये ठेवा
- ट्रिपचे स्टेटस, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर ठेवू नये
- परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
- खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी
- दागिने सोबत घेऊन फिरण्यासाठी जाऊ नये
- समारंभासाठी बाहेर पडताना दागिन्यांचे प्रदर्शन टाळा
- सुटीसाठी जाताना शेजाऱ्यांना, नातेवाइकांना माहिती द्या
- घराच्या खिडक्या, दरवाजा व्यवस्थित बंद करा
- एखाद्या खोलीतील लाइट सुरू ठेवावी
- शेजारच्या बंद घरांवर लक्ष ठेवावे
- नजरेस पडेल, अशा ठिकाणी डीव्हीआर ठेवू नये

‘‘सुटीत घरफोडीच्या घटना काही प्रमाणात वाढतात. अशा घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यासह इतरही प्रयत्न केले जातात. नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबतची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यास अथवा मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधा. तत्काळ मदत पोहोचवली जाईल. बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू बॅंकेत ठेवा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. ट्रीपची कसलीही माहिती सोशल मिडीयावर टाकू नका.’’
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

घरफोडी, चोरीच्या घटना (२०२२)
महिना घरफोडी इतर चोरी
जानेवारी २८ १७९
फेब्रुवारी ३९ १४८
मार्च २७ २०९
एप्रिल २६ २४१
मे ३९ २८२
जून ४० २७८
जुलै ४४ २५९
ऑगस्ट ३४ २६३
सप्टेंबर ४८ २०९

ऑक्टोबर ३१ २३७
नोव्हेंबर ४८ २१९
डिसेंबर ४७ २६२
------------------
२०२३
जानेवारी ४२ २३६
फेब्रुवारी ३० १७२
मार्च २७ २११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT