पिंपरी-चिंचवड

तहसीलदार कार्यालय समस्यांच्या विळख्यात कमी मनुष्यबळ ः कार्यालयासाठी जागा अपुरी, पार्किंगवरून वादावादीचे वाढते प्रकार

CD

पिंपरी, ता. २९ ः जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद पार पडली. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्य सादर करून, रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सादर केलेली जुगलबंदी व श्री गजानन महाराज यांची आरती यास प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार व कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्टस्‌, पिंपरी, पुणेचे संचालक डॉ. नंदकिशोर कपोते, प्रा. डॉ. स्वाती दैठणकर, निकिता मोघे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका प्रा. स्वाती दैठणकर यांच्या नृत्याने झाली. त्यांनी ‘भजे गोविंदम‌’ व ‘शबरी‌’ यावर भरतनाट्यम नृत्य सादर केले. यानंतर कपोते यांना तबलासाथ पंडित कालीनाथ मिश्रा, गायनसाथ पंडित संजय गरुड, सितारसाथ अलका गुजर, बासरीसाथ अजहरुद्दीन शेख, पखावजसाथ ज्ञानेश कोकाटे यांनी केली. यानंतर डॉ. नरेंद्र कडू (संचालक- शैक्षणिक) यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यांनी अभंग, भजन आदी प्रकार सादर केले.
यानंतर खास जागतिक नृत्य परिषदेसाठी देश-विदेशातून आलेल्या कलाकारांनी शोध निबंध सादर केले. यात दिल्ली- रजनी राव, राहुल रजक, कुवेत- किरण जावा, अमेरिका- किरण चव्हाण, हैदराबाद- प्रेरणा अग्रवाल, प्रियांका भारदे , सोलापूर- मनिषा जोशी, मुंबई- डॉ. सुनील सुंकारा, पौलमी मुखर्जी, स्मृती तळपदे, अक्षोभ्य भारद्वाज, अमृता साळवी, पुणे- डॉ. परिमल फडके, मुग्धा डिसूझा, अमला शेखर, आकांक्षा ब्रह्मे, रोहिणी कुलकर्णी, भोपाळ- कविता तिवारी, जयपूर- मनस्विनी शर्मा आदी कलाकार सहभागी झाले होते. त्यांनी नृत्य शिल्प, नृत्य साहित्य, नृत्य शास्त्र, नृत्य मानसशास्त्र अशा विविध विषयांवर शोध निबंध सादर करून शास्त्रीय नृत्यही सादर केले.

फोटोः 40064

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT