पिंपरी, ता. ३० : ॲप डाऊनलोड करण्यास सांगून, एकाची पन्नास हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार बावधन येथे घडला.
अंजुम शहा बी बेल (रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी संपर्क केलेल्या व्यक्तीने फिर्यादीला झोलो ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर व्हाट्सअप क्रमांकावर क्युआर कोड पाठवून फिर्यादीला वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने ऑनलाइनद्वारे ४९ हजार ९९५ रुपयांची फसवणूक केली.
--------
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.