पिंपरी-चिंचवड

शिवतीर्थ मैदान वाचविण्यासाठी ‘भक्ती-शक्ती’ येथे स्वाक्षरी मोहीम ‘भक्ती-शक्ती’ येथे स्वाक्षरी मोहीम

CD

पिंपरी, ता. ८ : पीएमआरडीए प्रशासनाच्या निषेधार्थ व शिवतीर्थ मैदानाच्या समर्थनार्थ भक्ती-शक्ती उद्यान येथे दोन दिवस स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शहरातील अनेक पक्षांचे नगरसेवक, सामाजिक संघटनेचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील शिवप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ‘पीएमआरडीए’कडून शिवतीर्थ मैदान प्लॉटिंग काढून विक्री करण्याचा घाट घातला आहे. या मैदानाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भेटीचे वारसा सांगणाऱ्या तसेच, जगद्‍गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची ऐतिहासिक स्वागताची साक्ष आहे. शहरातील सर्वात मोठी शिवजयंती याच मैदानावर साजरी केली जाते. यात हजारो शिवप्रेमी सहभागी होत असतात. भक्ती-शक्ती शिल्पाशेजारील ऐतिहासिक व धार्मिक वारसा असणाऱ्या शिवतीर्थ मैदानाचे व्यापारीकरण करून बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न पीएमआरडीए प्रशासनाकडून सुरू आहे.
या मोहिमेचे नियोजन भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे अभिषेक म्हसे, सागर तापकीर, जीवन बोराडे, सचिन ढोबळे, अक्षय कारंडे, अतुल वरपे, भावेश काचा, हेमंत शिर्के, प्रसाद फिरोदिया, प्रतीक इंगळे, जालिंदर काटकर, गौरव सूर्यवंशी आदींनी केले होते. समितीच्या वतीने पीएमआरडीए कार्यालयासमोर लवकरच मोठे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे जीवन बोराडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT