पिंपरी-चिंचवड

कासारसाई धरणाजवळील गावठी दारूभट्टीवर छापा

CD

सोमाटणे, ता. ६ ः कासारसाई धरणाजवळ गावठी दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक लाख ६२ हजार रुपयांची दारू व रसायन नष्ट करण्यात आले.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासारसाई धरण परिसरात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. या माहितीच्या आधारे दारुभट्टीच्या जागेचा शोध घेतला असता तेथे दोन हजार लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व साहित्य आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणातील दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या एक वर्षापासून स्थानिक पोलिसांनी पवनमावळातील गावठी दारुभट्ट्यांवर अनेक वेळा छापे टाकून नष्ट करण्याचे सत्र सुरू ठेवले असतानाही हा व्यवसाय पवनमावळातून हद्दपार होऊ शकला नाही. पवना कासारसाई नदीकाठ, द्रुतगती मार्ग परिसर व सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील भाग हा गावठी दारुभट्ट्यांसाठी सुरक्षित असल्याने आरोपी सतत पोलिसांना चकवा देत दारू भट्ट्यांचे ठिकाण बदलतात, त्यामुळे छापे टाकूनही हा व्यवसाय अद्याप सुरूच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT