पिंपरी-चिंचवड

राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत गायकवाड प्रथम

CD

सोमाटणे, ता. ११ ः राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत चांदखेडच्या नितीन गायकवाड याने हेक्टरी १३१.९७ क्विंटल भात उत्पादन काढून प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या एक दशकापासून चांदखेड येथील प्रगतशील शेतकरी गायकवाड यांनी रासायनिक खताचा वापर बंद करून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली होती. खते, कीटकनाशके ही देखील सेंद्रिय पदार्थांपासून तयार करून त्यांचा वापर भात, गहू, फळझाडे, कलिंगड, पेरू, खरबूज, मिरची, पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांसाठी केला. या सेंद्रिय शेती पद्धतीच्या उपक्रमामुळे उत्पादन दुपटीने वाढल्याचे त्यांना दिसून आले. गेल्या पाच वर्षापासून त्यांनी सेंद्रिय खताच्या वापरातून आधुनिक पद्धतीने भात पीक उत्पादनाचा प्रयोग केला, यामध्ये त्यांना यश आले. दरम्यानच्या काळात त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भात पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले. यातून त्यांनी कृषीविभागाचे अनेक पुरस्कार मिळवले होते. राज्यस्तरीय भात पीक स्पर्धा २०२२-२३ यामध्ये त्यांनी राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. सेंद्रिय पद्धतीने भातशेती करून हेक्टरी १३१.९७ क्विंटल उत्पादन मिळविल्याने त्यांची राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कारासाठी निवड झाली असून लवकरच हा पुरस्कार त्यांना मुंबई येथे वितरित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT