पिंपरी-चिंचवड

भरदिवसा गोळीबार करून चिखलीत तरुणाचा खून

CD

पिंपरी, ता. २२ : चप्पल शिवण्यासाठी चौकात आलेल्या तरुणाचा दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून खून केला. ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी श्री क्षेत्र टाळगाव-चिखली प्रवेशद्वाराजवळील चौकात घडली. तळेगाव येथे किशोर आवारे यांच्या हत्येची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
कृष्णा ऊर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय- २०, रा. महादेवनगर, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या तापकीर सोमवारी दुपारी चिखली येथील श्री क्षेत्र टाळगाव प्रवेशद्वाराजवळ चप्पल शिवण्यासाठी आला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले.
नागरिकांनी सोन्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोन्याचा मित्रपरिवार तसेच नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. त्यामुळे चिखली परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दोन संशयितांची नावे निष्पन्न
अवघ्या काही तासांच्याआत चिखली येथील खूनप्रकरणातील संशयित आरोपी सौरभ ऊर्फ सोन्या पानसरे (रा. मोई, ता. खेड), सिद्धार्थ कांबळे यांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत. यामध्ये वर्चस्ववादाची पार्श्वभूमी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच, मृत सोन्या तापकीर याची काही दिवसांपूर्वी संशयित तरुणांशी भांडणे झाली होती. या भांडणातूनच हा खून केल्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT