पिंपरी-चिंचवड

पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम संथगतीने

CD

पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान
पुलाचे काम संथगतीने सुरू


पिंपरी, ता. २६ : पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर येथील पवना नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. गेली दोन वर्षे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या ‘बीआरटीएस’ विभागामार्फत पिंपरी गाव ते पिंपळे सौदागरपर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही. एम. मातेरे इंफ्रा.(इ) प्रा. लि. यांना २२ डिसेंबर २०२२ रोजी १८ महिन्यांसाठी दिले आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. ओएस असिस्टीम स्तूप यांची निविदा पूर्व व निविदा पश्चात कामासाठी नेमणूक केली आहे.
या कामाची मुदत अनेक महिने पूर्ण होऊनदेखील अद्यापपर्यंत ६० टक्के देखील काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. तरीही ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

‘‘पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी अनेक नागरिकांनी तसेच माझ्यावतीने अनेकवेळा मागणी अथवा निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु; महापालिका अधिकारी, नागरिकांना वेठीस धरून, ठेकेदारांना पाठीशी घालणार असतील तर या विरोधात आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल.
- संदीप वाघेरे, माजी नगरसेवक, पिंपरी.

ॊॊपिंपरी गाव ते पिंपळे सौदागर या पुलाच्या वाढीव कामात नियोजनाचा अभाव असल्यामुळे ठेकेदाराकडून दिरंगाई झाली आहे. संबंधीत ठेकेदाराला नोटीस देऊन दर दिवसाला पाच हजार रुपयांचा दंड लावला आहे. सल्लागारांनी त्यांचे काम वेळेत केलेले आहे.
- प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, प्रकल्प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT