पिंपरी-चिंचवड

‘स्कूल बसबाबत शासनाने कठोर भूमिका घ्यावी’

CD

पिंपरी, ता. १८ ः पिंपरी-चिंचवडसह राज्यातील शहरांमध्ये स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसबाबत शासनाने कठोर कारवाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला निवेदन पाठवले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील स्कूल बसचालक सर्रासपणे नियमांना डावलून बस चालवत आहेत. अनेक बस चालकांनी बसचे योग्यता प्रमाणपत्र घेतलेले नाही. जून महिन्यात सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्व शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. ‘आरटीओ’कडून तसे आवाहन करूनही बसमालक व चालकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे, अशी तक्रार त्यांनी निवेदनात केली आहे.

‘‘ज्या बस चालक-मालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यांना प्रवास करण्याची परवानगी देऊ नये. तसेच अवैधरीत्या नियमबाह्यपणे अधिक विद्यार्थ्यांना एका बसमध्ये बसवून प्रवास केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.’’
- दीपक मोढवे-पाटील, माजी शहर उपाध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

Leopard Rescue Chalisgaon : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पण शेतकऱ्याच्या एका फोनमुळे वाचले आयुष्य; चाळीसगावातील रेस्क्यूचा असा झाला शेवट

Beed News: बीडमध्ये उष्णतेचा कहर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट; तापमान ४२°C; शहरात उन्हाचा कडाका पाहायला मिळाला

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

SCROLL FOR NEXT