Home purchase esakal
पिंपरी-चिंचवड

Home Purchase : पिंपरी-चिंचवडमध्ये गृहखरेदीतून हजारो कोटींची उलाढाल

गृहखरेदी किंवा सध्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांनुसार पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे ढोबळमानाने दोन भागात विभाजन केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कचे सानिध्य, रस्त्यांमुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी, दळणवळणाची साधने, हॉटेल्स- हॉस्पिटल्स- शाळा- महाविद्यालये- मॉल्स अशा सुविधांमुळे शहराच्या पश्चिमेकडील भागात नागरिकांनी घर घेण्यास पसंती दर्शवली असल्याचे दिसते. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी घरांना अधिक मागणी असून त्यातून हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे गृह खरेदी-विक्रीच्या आलेखावरून दिसते आहे.

गृहखरेदी किंवा सध्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांनुसार पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे ढोबळमानाने दोन भागात विभाजन केले जाते. उत्तर-पूर्व भाग अर्थात चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली व दिघी आणि पश्चिम भाग अर्थात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी आणि शहरालगतचा हिंजवडी या भागांत सध्या मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प साकारले जात आहेत.

नागरिकांच्या पसंतीनुसार एक बीएचकेपासून चार बीएचकेपर्यंत घरे उपलब्ध आहेत. पश्चिम भागात तुलनेने घरांच्या किमती अधिक असल्या तरी महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांमुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी; दळणवळणासाठी पीएमपी बससेवा, भविष्यात मेट्रो सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पंचतारांकित हॉटेल्स, नामांकित संस्थांची शैक्षणिक संकुले, त्यात केजीपासून पीजीपर्यंतच्या सुविधा.

होऊ घातलेले मॉल्स आणि देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग अर्थात मुंबई-बंगळूर महामार्गाचा सेवा रस्ता निर्मितीची सुरू असलेली प्रक्रिया; मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, प्रस्तावित रिंगरोड अशा कारणांमुळे घर घेण्यास नागरिकांनी पसंती दिल्याचे दिसत आहे.

अशी आहे स्थिती

कालावधी / गृहखरेदी / उलाढाल (कोटी रुपयांत)

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ / १,११२ / ७०९

एप्रिल ते जून २०२३ / १,४६४ / १,२५९

(टीप - ही गृहखरेदी हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे भागातील केवळ सर्वाधिक उलाढाल झालेल्या टॉप १० गृहप्रकल्पांची आहे.)

‘माझ्या मोठ्या मुलाने पुनावळेत फ्लॅट घेतला आहे. आता लहान मुलालाही घर घ्यायचे आहे. तो ताथवडे परिसरात दोन किंवा तीन बीएचकेचा फ्लॅट बघत आहे. या भागापासून त्याची कंपनी जवळ आहे. शिवाय, मुंबई वा सातारा, कोल्हापूर भागाकडे जाण्यासाठी सोईचे ठिकाण आहे.’

- के. नितीन, ताथवडे

‘शहराच्या पश्चिम पट्ट्यात दरवर्षी २७ ते २८ हजार घरांची विक्री होत आहे. आता ताथवडे, पुनावळे, रावेतमधील घरांना अधिक मागणी आहे. जवळच असलेले नवी मुंबई विमानतळ, मेट्रोचे जाळे, ग्रीन बिल्डिंग पॉलिसी यामुळे नागरिक घर घेण्यास या भागाला प्राधान्य देत असल्याचे दिसते.’

- राजू भिसे, बांधकाम व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT