पिंपरी-चिंचवड

चऱ्होलीत सोसायटीच्या बैठकीत अध्यक्षाकडून सभासदाला मारहाण

CD

पिंपरी, ता. २७ : सोसायटीच्या बैठकीत बिल्डर आमचे मेंटनन्सचे पैसे परत कधी देणार असे विचारल्याच्या रागातून सोसायटीच्या अध्यक्षासह आणखी एकाने सभासदाला बेदम मारहाण केली. हा प्रकार चऱ्होली येथे घडला.
मनोरंजनकुमार सत्येंद्र सिंग (रा. एफ १, किंग्ज बरी सोसायटी, प्राइड वर्ल्ड सिटी, चऱ्होली, मूळ- बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंदीप सिंग (वय ३५), श्रीनिवास रकाले (वय ३५, दोघेही रा. एफ २, किंग्ज बरी सोसायटी, प्राइड वर्ल्ड सिटी, चऱ्होली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील कम्युनिटी हॉल येथे सोसायटीच्या सभासदांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फिर्यादी यांनी कमिटीच्या सदस्यांना सोसायटीचे बिल्डर आमचे मेंटेनन्सचे पैसे परत कधी देणार व किती देणार असे विचारले. याचा राग आल्याने फिर्यादीच्या सोसायटीतील मंदीप सिंग व सोसायटीचा अध्यक्ष श्रीनिवास रकाले यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली. मंदीप याने फिर्यादीच्या हाताचे बोट फ्रॅक्चर केले. तर रकाले याने लहान लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या पोटावर मारून जखमी केले.

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक
महिलेला धमकी देत मारहाण केली. गर्भवती असतानाही अत्याचार करीत रोकड व दागिने काढून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल गौतम नाईवाडे (वय २७, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या लग्नाअगोदरच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत वेळोवेळी त्यांना मारहाण केली. फिर्यादीने गर्भवती असल्याचे त्याला सांगत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. फिर्यादीला भीती दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी साठ ते सत्तर हजार रुपये तसेच गळ्यातील साखळी जबरदस्तीने घेतली.

रस्ता अडवून दोघांना टोळक्याकडून बेदम मारहाण
टोळक्याने रस्ता अडवून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. हा प्रकार काळेवाडी बसथांबा व डांगे चौक बस थांबा येथे घडला. श्रेयश मारुती कस्पटे (वय २०, रा. कस्पटे वस्ती, वाकड), अथर्व गणेश कस्पटे (वय १८, रा. छत्रपती चौक, वाकड), एक अल्पवयीन मुलगा व इतर चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांचा दहावीचा पेपर देऊन घरी जात होते. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी जवळ येऊन त्यांना एका मुलाचा मोबाईल नंबर मागितला. फिर्यादीने नंबर न दिल्याने आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादीचा रस्ता अडवला. शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याच पद्धतीने फिर्यादीचा मित्र किसन रमेश आडसूळ यालाही डांगे चौक बस थांबा येथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT