पिंपरी-चिंचवड

पालिका, सीपीसी, पीकेसी यांच्यात सामंजस्य करार

CD

पिंपरी, ता. २९ ः वाढते शहरीकरण, पायाभूत सुविधा, पाणी वापर व पुरवठा याबाबत धोरणे बनविण्यात येत आहे. त्यासाठी जागतिक जल दिनानिमित्त महापालिका, सीपीसी ॲनालिटिक्स आणि पुणे नॉलेज क्लस्टर (पीकेसी) यांच्यात पाणी आणि शाश्वतता उपक्रमांवर सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार झाला. पाणीपुरवठा, वापर, जलप्रक्रिया, पाणलोट क्षेत्र आणि नैसर्गिक संसाधने आदी बाबींवर काम केले जाणार आहे. महापालिका प्रशासक शेखर सिंग म्हणाले, ‘‘महापालिका सर्व नागरिकांसाठी पाण्याची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. या करारामुळे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे शहराची पाण्याची मागणी आणि पुरवठा समजून घेण्यात आणि नियोजन करण्यात मदत होईल.’’
पुणे नॉलेज क्लस्टरच्या प्रकल्प प्रमुख डॉ. अश्विनी केसकर म्हणाल्या, ‘‘पुणे महानगर प्रदेशासाठी शाश्वत जल कृती आराखडा विकसित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महापालिकेसह जिल्ह्यातील इतर सरकारी संस्थांमध्ये समान अभ्यास करण्यास मदत करेल.’’ सीपीसीचे ओंकार साठे उपस्थित होते.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT