पिंपरी-चिंचवड

दोन हजार सुशोभित कुंड्यांमध्ये कचरा हातगाडी व्यावसायिकांकडून दुरुपयोग होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी

CD

पिंपरी, ता. ३० : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहर स्मार्ट करण्यासाठी विविध फंडे वापरले आहेत. त्यातील एक म्हणजे, शहरातील विविध भागात भल्यामोठ्या रंगीबेरंगी कुंड्यांमध्ये सुशोभीकरणासाठी झाडे लावली आहेत. बागबगीचा प्रेमीं व सर्वसामान्यांनाही या कुंड्यांचा मोह आवरत नाही. परंतु, सध्या रस्त्याच्याकडेला मांडलेल्या या दोन हजार कुंड्यांचा वापर व्यावसायिकांनी थेट कचऱ्यासाठी केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात पिंपळे-सौदागर, वाकड, भक्ती-शक्ती चौक, रावेत या भागात हातगाडी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांनी दिवसाढवळ्या कुंड्यांमध्ये कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. दिवसभरात कचऱ्याची गाडी येऊन गेल्यास रात्री साचलेला कचरा व्यावसायिक कुंड्यांमध्ये बिनधास्तपणे फेकत आहेत. यामध्ये सुका व ओला तसेच प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

व्यावसायिकांकडे कचरा साठविण्याची सोय नसल्याने अशी शक्कल लढविली जात आहे. कचरा कुंड्यांमध्ये टाकल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता व्यावसायिकांनी कुंडीतील सुकलेली रोपे काढून, त्या कुंड्यांची डस्टबिन म्हणजेच, कचराकुंड्या तयार केल्या आहेत. त्यामुळे, सुशोभीकरणासाठी असलेल्या कुंड्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
--
सर्व झाडांच्या कुंड्या साफ करण्यास सांगितल्या आहेत. ज्या ठिकाणी कुंड्यांमध्ये कचरा असेल, त्या ठिकाणी व्यावसायिकांवर कडक कारवाई केली जाईल. व्यावसायिकांना समजायला हवे. अन्यथा, नोटिसा देवून ५० हजारांचा दंड आकारण्यात येईल. कुंड्यांना पाणी कोणी टाकत नाही. मात्र, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत. यापुढे, मिळकत करातून दंड लावला जाईल.
- सुभाष इंगळे, उपायुक्त, उद्यान विभाग
--
कुठे आहेत या सुशोभित कुंड्या
भोसरी ब्रिज, मोशी, वाकड, औंधरस्ता, पिंपळेसौदागर, रावेत हँगिंग ब्रिज, भक्ती-शक्ती रस्ता
--
एकूण सुशोभित कुंड्यांची संख्या
२ हजार
--
सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून नजर
शहरातील टोलेजंग इमारती व रस्तोरस्ती अनेक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यातून व्यावसायिकांवर लक्ष ठेऊन कारवाई करणे शक्य आहे. तसे झाल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्यापासून मदत होणार आहे.
--
फोटोः 33737, 33738

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT