aap party
aap party sakal
पिंपरी-चिंचवड

Aap Party Swarajya Yatra : पिंपरी शहरात उद्या, परवा ‘आप’ची स्वराज्य यात्रा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा २८ मे ते ६ जूनपर्यंत ८८३ किलोमीटरचा पल्ला पूर्ण करत आहे. महाराष्ट्राचे भक्तीस्थळ पंढरपूर ते शक्तीस्थळ किल्ले रायगड येथे यात्रेचा समारोप होणार असून, ३ व ४ जून रोजी ही यात्रा शहरातून जाणार आहे. या यात्रेत शहरातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्यात येणार आहे.

आपचे राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया याच्या मार्गदर्शनाखाली आपच्या स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य यात्रेचा मुख्य उद्देश हा राज्यातील गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या समजून त्यांना वाचा फोडणे आणि दिल्ली आणि पंजाबच्या जनतेसारखं आम आदमी पार्टीला मतदान केल्यावर पक्ष महाराष्ट्र राज्यात काय बद्दल करू शकतो, हे पटवण्यासाठी पक्षाची पूर्ण कार्यकारिणी जमिनीवर काम करीत आहे.

स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपने महाराष्ट्रामध्ये संघटन विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे. रावेत येथे समारोप करून स्वराज्य यात्रा पुढे पनवेल मार्गे रायगडकडे मार्गस्थ होणार आहे, अशी माहिती स्वप्नील जेवळे व राज चाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वराज्य यात्रेचा शहरातील प्रवास आणि कार्यक्रम

- ३ जून - दुपारी एक वाजता जुनी सांगवी येथे रॅली

- ३ जून - दुपारी साडेतीन वाजता संत तुकारामनगर येथे पदयात्रा

- ३ जून - सायंकाळी पावणेपाच वाजता जाधववाडी येथे रॅली

- ३ जून - सांयकाळी साडेसहा वाजता आकुर्डी येथे जनसभा

- ४ जून - सकाळी आठ वाजता भक्ती-शक्ती येथे रॅली

- ४ जून - सकाळी नऊ वाजता रावेत येथे पदयात्रा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT