पिंपरी-चिंचवड

प्रा. शीतलकुमार रवंदळे यांचा सल्ला ः बारावीनंतरच्या उच्चशिक्षणाची प्रवेश प्रक्रियावर चर्चासत्र कॉलेज परिसर पाहूनच अभियांत्रिकीला प्रवेश घ्या

CD

पिंपरी, ता. १६ ः ‘‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या चांगल्या ग्रुपच्या महाविद्यालयांची निवड करणे आवश्‍यक आहे. कॉलेजचा परिसर पाहूनच अभियांत्रिकीला प्रवेश घ्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताच प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध होतील,’’ असा सल्ला प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.

‘सकाळ विद्या’, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड विद्यापीठ यांच्यातर्फे आकुर्डी रेल्वेस्थानक-प्राधिकरण येथील पीसीसीओई कॉलेजच्या पीसीईटी सभागृहात विद्यार्थी व पालकांसाठी ‘बारावीनंतरच्या उच्चशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात ‘इंजिनिअरिंगमधील करियरच्या संधी आणि प्लेसमेंटची पूर्वतयारी’ याविषयावर प्रा. रवंदळे यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. रवंदळे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता निवडली पाहिजे. त्यावरच तुम्ही नेमक्‍या कोणत्या शाखेत प्रवेश घेऊ शकता किंवा नेमके कोणत्या शाखेत ‘स्कोप’ आहे, याची माहिती घेणे आवश्‍यक ठरते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. यावर्षी ‘पीसीएम’मध्ये ४५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. उतरत्या क्रमाने ‘ऑप्शन क्रमांक’ भरला पाहिजे. पालकांनी सर्वसमावेशक विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक शाखेला स्कोप असल्याने सध्या ज्या कॉलेजमध्ये ‘प्लेसमेंट’ची सोय आहे, अशांना प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. कारण आता विविध कंपन्यांकडून स्किलनुसार मागणी होत आहे. कॉलेजचा आत्मा फॅकल्टी असतो. यासाठी गुणवत्तापूर्ण प्राध्यापकांची गरज असते.’’

‘दहावी आणि बारावीनंतर करियरच्या संधी’ यावर विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना असंख्य करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रालादेखील अभियांत्रिकी आधारभूत आहे. आता प्रत्येक क्षेत्राच्या शाखेत अभियांत्रिकी अंतर्भूत असल्याचे दिसते. मुलींना मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये चांगला स्कोप आहे. नव्या टेक्‍नॉलॉजीचा वापर करून, त्या यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करूनच करिअरची निवड करावी. सीईटी, नीट, जेईई आणि बारावीच्या गुणांची सांगड घालूनच शाखा निवडावी. फार्मसी, पॅरामेडिकल, स्पीचथेरपी, बीबीए, ॲग्रिकल्चरल, बी. व्होकेशनल कोर्स, डिफेन्स, नेव्ही, इंडियन आर्मी, पशुवैद्यकीय अधिकारी होऊ शकतात.’’

डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्‍चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आर्किटेक्‍चर साधे वाटत असले तरी सोपे नाही. कारण त्यामध्ये तुमच्या कौशल्याला महत्त्व असते. ‘नाटा’ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पुस्तकी ज्ञानाबरोबर नावीन्यपूर्ण कल्पनांची जोड मिळाल्यावरच एखादा प्रोजेक्‍ट युनिक बनू शकतो. आर्किटेक्‍चरला अधिकृत परवाना असतो. त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागते. एक चूक झाली तरी परवाना रद्द होऊ शकतो. सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीच्या पुष्कळ संधी आहे. तसेच व्यावसायिकदेखील होऊ शकता.’’

दरम्यान, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी होणार आहे? प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होणार? ही प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत चालेल? आणि महाविद्यालये नेमके कधी सुरू होतील. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याची प्रा. केतन देसले यांनी माहिती दिली. डॉ. सागर भंडगे, कुशल जाधव आणि रूचू कोटीयाला यांनी पिंपरी-चिंचवड विद्यापीठमधील विविध सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

49670
49671


49673
49674

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT