पिंपरी-चिंचवड

सकाळ विद्या प्रतिक्रिया

CD

सकाळ एज्यु एक्स्पो मध्ये कोट
---------------------------
‘‘बी टेक एरोस्पेस अभियांत्रिकी, बी टेक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एम टेक एरोस्पेस अभियांत्रिकी, विमान देखभाल अभियांत्रिकी, शॉर्ट टर्म डिप्लोमा इन केबिन क्रू, एव्हिएशन मॅनेजमेंट, एअर तिकीट असे करिअर पर्याय आहेत. शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची २००१ पासून सुरवात झाली. उत्कृष्ट प्लेसमेंट, वर्गातील सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा लाइव्ह एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, एअरक्राफ्ट इंजिन, एअरक्राफ्ट हँगर, २५ हून अधिक मॉकअप आणि प्रॅक्टिकलसाठी लॅब सुविधा आहे. ‘सकाळ विद्या एक्स्पो’च्या माध्यमातून प्रत्यक्षात माहिती मिळणार आहे.
- अंशुल बी. शर्मा, संस्थापक अध्यक्ष, शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे.

‘‘करिअर निवडताना अनेक संभ्रम निर्माण होतात. ऑनलाइन मिळणाऱ्या माहितीची विश्वासार्हता तुलनेने कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या विविध संधीची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचा योग ‘सकाळ विद्या एक्स्पो’च्या निमित्ताने जुळून आला आहे. डिजिटल युगात करिअरच्या अनेक वाटा उपलब्ध होत असताना पारंपरिक शिक्षण मागे पडताना दिसते, पालक आणि विद्यार्थ्यांना या नव्या शिक्षणाच्या संधी समजण्यासाठी ‘सकाळ विद्या एक्स्पो’ हे प्रभावी माध्यम ठरेल. गेली अनेक वर्षे आमचे सृजन कॉलेज ऑफ डिझाइन देखील यात सहभागी होत आहे.’’
- संतोष रासकर, कार्यकारी संचालक सृजन कॉलेज ऑफ डिझाइन.

‘‘वारवडी गावात निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. येथे हॉस्टेलची सोय आहे. याठिकाणी ८० सीट आहेत. बारावीनंतर आर्किटेक्चर शाखेचा डिग्री कोर्स आहे. निवासी सोय आहे. कारण इथे विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव देण्यास शिकवले जाते. विद्यार्थ्यांचे ड्रॉइंग चांगले असणे आवश्‍यक आहे. ‘सकाळ विद्या एक्स्पो’ च्या माध्‍यमातून विद्यार्थी व पालकांना प्रबोधन करण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ विद्या एक्स्पो’मध्ये पालकांना भरपूर करीअरच्या संधीची नव्याने माहिती मिळणार आहे.’’
- सोनल निर्मळ, प्राचार्य, आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइन, पुणे.

‘‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मेडिकल, आयआयटी सारख्या क्षेत्रात तांत्रिक कौशल्ये तयार करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ दिले जाते. ‘पेस ॲकॅडमी’कडून शैक्षणिक संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील पालक व विद्यार्थ्यांना करियरच्या विविध क्षेत्रातील संधीबाबत नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक पालक आणि विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देणे आवश्‍यक आहे.’’
- नीरज कुमार, ॲकॅडमिक हेड, पेस ॲकॅडमी आयआयटी आणि वैद्यकीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

आजचे राशिभविष्य - 16 मार्च 2026

SCROLL FOR NEXT