पिंपरी, ता. २२ ः पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे, थेरगाव येथे आयोजित १२ वर्षांखालील ‘व्हेरॉक करंडक’ क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी (ता.२२) ‘क्रिकेट नेक्स्ट’, ‘आर्यन्स’ या संघांनी साखळी फेरीत विजय मिळविले. गोलंदाज अर्णव रणदिवे, सार्थ बडदे सामन्याचे मानकरी ठरले.
पहिल्या साखळी सामन्यात क्रिकेट नेक्स्ट संघाने जिनियस क्रिकेट अकादमीवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळविला. विजयी संघाचा गोलंदाज अर्णव रणदिवे सामनावीर ठरला. अवि गुप्ता, रिवान रांगणेकर यांनीही चांगली गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात आर्यन्स क्रिकेट अकादमीने कोचिंग बियॉन्ड संघाला ६८ धावांनी पराभूत केले. विजयी संघाच्या सर्वेश सांगळे याने सुरेख अर्धशतक झळकाविले. मात्र, अद्वय तिवारी याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. गोलंदाज सार्थ बडदे सामन्याचा मानकरी ठरला. त्याने ३ खेळाडू तंबूत पाठविले. त्याला शंभू वांजळे यानेही चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक ः जिनियस ः १०.५ षटकांत ८ बाद २५ (अर्णव रणदिवे २/७, अवि गुप्ता २/११, रिवान रांगणेकर २/२) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट ः ४.४ षटकांत बिनबाद २८ - अभिनव मुंढे १४; आर्यन्स ः ४० षटकांत ८ बाद २०७ - सर्वेश सांगळे ५०, अद्वय तिवारी ४९, यज्ञेश मोहिते ३५ (अधिराज जाधव २/३१) वि.वि. कोचिंग बियॉन्ड ः ३७.१ षटकांत सर्वबाद १३९ - आरव येळे ३१ (सार्थ बडदे ३/११, शंभू वांजळे ३/३४)
PNE24U57479, PNE24U57481
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.