पिंपरी, ता. १७ ः दुचाकीवर स्टंटबाजी करण्याच्या नादात तरुण मुले स्वतःच्या आणि इतरांच्याही जिवाशी खेळत आहेत. भर रस्त्यात व्हिडिओसह फोटोशूट करणाऱ्या तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे चित्र दिसते. या स्टंटबाजीतून ही मुले स्वतःच्या जिवाबरोबर अन्य वाहनचालकांचा जीवही धोक्यात घालता आहेत. बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, तरीही काही ठिकाणी मुलाचे असे ‘उद्योग’ सुरु असतात.
ट्रिपल सीट जोरात दुचाकी दामटायची, सायलेन्सरमधून मोठा आवाज काढायचा, भरधाव येऊन अचानक यु टर्न मारायचा, भरधाव आल्यानंतर अचानक ब्रेक दाबून काही अंतरापर्यंत दुचाकी घासत न्यायची, असे स्टंट पाहायला मिळत आहेत. आणि याचे व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकले जातात. चिंचवडमधील सेंट मदर तेरेसा या पूल, रावेत येथील बास्केट पुला आणि इतरही ठिकाणी तरुण हे दुचाकीचे स्टंट करत असते.
तरुणांना राहत नाही भान
स्टंटबाजी करताना आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहन चालकांनाही धोका निर्माण होतो. अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत नागरिक संताप व्यक्त करतात. मात्र, याचे या तरुणांना भान राहत नाही. अशीच एक घटना रावेत येथील रॉयल कासा सोसायटीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर ४ नोव्हेंबरला घडली. विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने ६८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली. यासह इतरही घटना घडत असतात. अशा बेशिस्त चालकांवर पोलिसांकडून कारवाई केली असली तरी त्या बेशिस्त चालकांचा ‘सुसाट’ वेग कमी होताना दिसत नाही.
----------------------------------
सुरळीत वाहतूक राहण्यासह रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांत रॅश ड्रायव्हिंगसह मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई झाली आहे. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड.
----------------------
ड्रंक अँड ड्राईव्ह व रॅश ड्रायव्हिंगची या वर्षीची जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंतची कारवाई
जानेवारी - २५३
फेब्रुवारी १०२
मार्च - ५६०
एप्रिल - ९५
मे - ५३७
जून - ८४५
जुलै - २२८
ऑगस्ट - २३९
सप्टेंबर - १८१
ऑक्टोबर - १८३
--------------------------
एकूण - ३ हजार २२३
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.