पिंपरी-चिंचवड

आमदार लांडगे यांच्यामुळे विकास माजी नगरसेविका योगिता नागरगोजे यांचे प्रतिपादन

CD

पिंपरी, ता. १७ ः भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण भोसरी मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले. त्यांच्यामुळे कृष्णानगर, पूर्णानगर भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अटलबिहारी वाजपेयी उद्यान, दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, भुयारी मार्ग, घरकुलसाठी मल्टीपर्पज टाऊन हॉल असे अनेक चांगले प्रकल्प साकारले आहेत, असे प्रतिपादन माजी नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी केले.
नागरगोजे म्हणाल्या, ‘‘पूर्वी पूर्णानगर येथील खाणीत घाणीचे साम्राज्य होते. डुकरांचा सुळसुळाट होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अटल बिहारी वाजपेयी उद्यान साकारण्यात आले. आज देशभरातून हे उद्यान पाहण्यासाठी लोक येत आहेत. या भागात खेळाला मैदान नाही, हे लक्षात घेऊन दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण उभारण्यात आले. स्केटिंग, क्रिकेट, कबड्डी, टेनिस अशा स्पर्धा होतात. शरदनगर, कोयनानगर, स्पाईन रोडच्या लोकांचा प्रश्न लक्षात घेऊन, तिथे भुयारी मार्ग उभारला. घरकुलमध्ये सर्वसामान्य कामगार वर्ग आहे. त्याच्यासाठी छोटे-मोठे कार्यक्रम करण्यासाठी मल्टीपर्पज टाऊन हॉल उभारला. स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालय उभारले. घरकुलमध्ये सुसज्ज भाजी मंडई तसेच सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेचे रुग्णालय सुरू केले. घरकुलाला सीमा भिंत बांधली. पूर्णानगर येथील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट होती. मात्र, आज तेथे सिमेंटचे रस्ते आहेत. महावितरणच्या डीपी बसविल्या आहेत. बहुउद्देशीय हॉल उभारला आहे.’’
आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण भोसरी मतदारसंघाच्या विकासासाठी खूप मोठे काम केले आहे. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी संतपीठ, देशातील पहिले संविधान भवन, स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, भामा-आसखेड, आंद्रा प्रकल्पातून जादा पाणी आणले आहे. चऱ्होली, मोशी भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने लोक सदनिका घेण्यास प्राधान्य देत आहेत. एकूणच विकासाच्या दृष्टीने आमदार महेश लांडगे यांनी केलेले काम अनेक वर्षे लक्षात राहील, असेही नागरगोजे यांनी सांगितले.
---
फोटो ः 63503

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT