पिंपरी, ता. २४ ः केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघच नाही तर पिंपरी चिंचवड शहरदेखील राहण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम बनवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी केला. मुलांच्या शिक्षणापासून ते ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न यासोबतच पाणी, वाहतूक, रस्ते, दळणवळण या सगळ्याच पायाभूत सुविधांचा विकसित करण्याकडे भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगताप म्हणाले, ‘‘शहरातील पवना, इंद्रायणी, मुळा या तीनही नद्या पुढील तीन ते चार वर्षांमध्ये प्रदूषणमुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वीच काम सुरू झालेले आहे. शहराचे वाढते शहरीकरण पाहता, निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. बांधकाम करताना धुळीचे प्रमाण कसे कमी करता येईल, याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या जातील.
पिंपरी चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट उपनगरांमधील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधा देण्यासोबतच या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
शहरातील कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासाठी व वाकड, पुनावळे भागातील नागरिकांची मनोरंजनाची गरज ओळखून या भागात लवकरच टाऊन हॉल उभारण्याचे नियोजन आहे. शहरातील शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा या सगळ्यात क्षेत्रातील समस्या दूर करण्याकडे माझा भर राहील. नागरिकांचे जीवनमान उंचावणे व पिंपरी चिंचवड राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कसे होईल, असा माझा प्रयत्न आहे, असे जगताप यांनी सांगितले.
--------------------
विकासाचा अजेंडा
१) हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी पुनावळे येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे.
२ ) क्रीडांगणे, उद्यानेदेखील विकसित केली जाणार आहेत.
३) इलेक्ट्रिक बस, बीआरटी, मेट्रो सेवा यांच्यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम करण्याकडे भर देणार
४) पुनावळे, वाकड भागात राष्ट्रीय महामार्गावर असणारे भुयारी मार्ग, सेवा रस्ते यांची कामे पूर्णत्वास नेणार.
५) हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाकड ते हिंजवडी सहा पदरी पुलाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.