पिंपरी-चिंचवड

‘सकाळ’च्‍या वर्धापनदिनी चिंचवडमध्ये आज स्‍नेहमेळावा

CD

पिंपरी, ता. २९ : ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३२ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. ३०) आहे. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी साडेपाच ते साडे आठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला आहे. त्यास वाचकांसह हितचिंतक, विक्रेते, जाहिरातदार यांनी उपस्थित राहावे. मात्र, पुष्पगुच्छ आणू नयेत, असे आवाहन ‘सकाळ’ व्यवस्थापनाने केले आहे.
गावागावांचे मिळून महानगर बनलेले पिंपरी-चिंचवड आज स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी झाले आहे. शहराचा विस्तार वाढला आहे. लोकसंख्या वाढली आहे. नागरी सुविधांबरोबरच नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. विविध क्षेत्रांत लौकिक मिळवत आहे. उद्योगांबरोबर कामगार, नोकरदार, ज्येष्ठ, महिला, युवक व बालगोपाळांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातील व प्रत्येकाच्या मनातील भाव-भावनांना व्यासपीठ मिळवून देणारा एक घटक म्हणजे ‘दै. सकाळ.’ वाचक, विक्रेते, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे प्रेम व शुभेच्छांच्या पाठबळावर पिंपरी-चिंचवड ‘सकाळ’ आज ३२ वर्षे पूर्ण करत आहे. ३३ व्या वर्षात पदार्पण करताना वाचक आणि हितचिंतकांचा स्नेहमेळावा शनिवारी (ता. ३०) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृहाच्या आवारात सायंकाळी साडेपाच ते साडे आठ या वेळेत आयोजित केला आहे. त्यास कला, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, आरोग्य, प्रशासकीय, पोलिस, शिक्षण, सेवा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रेमाचे आणि आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. या निमित्त भेटीगाठींसह कॉफी आणि अल्पोपाहाराचा आस्वादही घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT