पिंपरी-चिंचवड

‘दर्जेदार गझल लेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे असते’

CD

पिंपरी, ता. ४ ः ‘दर्जेदार गझल लेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे असते. मीना शिंदे या मराठीत दिवान लिहिणाऱ्‍या आद्य महिला गझलकार आहेत. आपल्या लेखनातून त्यांनी प्रयोगशीलता जपली आहे.’ असे गौरवोद्‍गार आद्य मराठी गझल संशोधक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी काढले. शब्दधन काव्यमंच तर्फे ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी.’ हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी सांगोलेकर बोलत होते. तसेच ज्येष्ठ गझलकारा मीना शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते.
‘साहित्यिक येता घरा, तोचि दिवाळी, दसरा’ अशी भावना माझ्या मनात आहे. सुमारे चोवीस वर्षांपासून शब्दधन या संस्थेशी माझे ऋणानुबंध आहेत. असे मनोगत सत्काराला उत्तर देताना मीना शिंदे यांनी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, अशोकमहाराज गोरे, संजय शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. तानाजी एकोंडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. जयश्री गुमास्ते यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT