पिंपरी-चिंचवड

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पोलिसाचा मृत्यू पिंपळे सौदागरमधील घटना ः वाहनचालक पसार

CD

पिंपरी, ता. ८ : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे येथे कार्यरत असलेल्या दुचाकीस्वार पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (ता. ७) रात्री घडली. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक पसार झाला आहे.
सचिन विष्णू माने (वय ४३, रा. आदित्य अपार्टमेंट, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. माने हे रविवारी (ता. ७) त्यांच्या वडिलांना घेऊन पुण्यातील खासगी रुग्णालयात आले होते. तेथील उपचारानंतर वडिलांना त्यांनी धायरी येथील बहिणीच्या घरी सोडले व दुचाकी घेऊन मोशी येथील घरी येत होते. दरम्यान, रात्री पावणेदहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पीके चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी माने यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-------------
मूळगावी अंत्यसंस्कार
सचिन माने हे २००३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यांच्यामागे आई- वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगी सातवीत व मुलगा बारावीत शिकत असून, पत्नी गृहिणी आहे. माने यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी जेजुरी येथे झाला.
-------------------

‘‘अपघातानंतर आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
- महेश बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे.
-----------------------------
फोटोः 31145

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT