सोमाटणे, ता. २ ः राज्य भात पीक स्पर्धेत चांदखेडच्या नितीन गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करून त्यांना पुरस्कार देण्यात आला.
गायकवाड यांना राज्यपालांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. गेल्या एक दशकापासून चांदखेड येथील नितीन गायकवाड यांनी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेतीला सुरुवात केली होती. त्यांच्या प्रयोगातून त्यांना मालाचा उच्च दर्जा व उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आली. त्यांच्या उपक्रमातून त्यांनी यापूर्वी उत्कृष्ट शेतकरी, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषी विद्यापीठाचा आयडॉल शेतकरी आदी पुरस्कार मिळवले आहेत. यानंतर त्यांनी कृषी विभागाच्या सहकार्याने सेंद्रिय भात पीक घेण्यास सुरुवात केली. त्यातही त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले आणि त्यांच्या भाताने तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. दरम्यानच्या काळात कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा, विभाग पातळीवरील भात पीक स्पर्धेत नितीन गायकवाड यांच्या भाताने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे त्यांच्या भाताची राज्य पातळीवर भात पीक स्पर्धेसाठी निवड झाली होती.
मुंबई ः नितीन गायकवाड यांना पुरस्कार वितरण करताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंढे आदींसह विविध विभागातील अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.