पिंपरी-चिंचवड

सीबीआयमधून बोलतोय ! तुमच्यावर गंभीर गुन्हे आहेत...

CD

पिंपरी, ता. ९ : लखनऊ सत्र न्यायालय तसेच सीबीआयमधून बोलत असून तुमच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी भीती घालून एकाकडून अनोळखी व्यक्तींनी १५ लाख ७४ हजार ६८८ रुपये उकळले. हा प्रकार थेरगाव येथे घडला.
याप्रकरणी थेरगावातील पाटीलनगर येथील ४३ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय मिश्रा, सीबीआय अधिकारी नाव सांगणारा अनोळखी व्यक्ती, सुरेश कोल्ड वॉटर खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस फोन करून तो लखनऊ सत्र न्यायालयातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीवर रावी इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीची केस आहे. त्यासाठी तुम्हाला कृष्णानगर पोलिस ठाणे लखनऊ येथे यावे लागेल, असे सांगितले. तिथे येणे शक्य नसेल; तर टेलिग्राम ॲप डाउनलोड करणे फिर्यादीला भाग पाडले. त्यावर आणखी एका अनोळखी व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. मनी लॉड्रिंग आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यात तुम्हाला अटक करायची आहे. तुमची मालमत्ताही जप्त करायची असल्याचा बनाव चोरट्याने रचला. फिर्यादीस भीती दाखवून अटक आणि इतर कारवाई टाळण्यासाठी त्यांना एका बँक खात्यावर १५ लाख ७४ हजार ६८८ जमा करण्यास भाग पाडले. आरोपींनी ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची फसवणूक केली. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT