पिंपरी-चिंचवड

दुचाकी चोरांना चाकणमध्ये अटक

CD

पिंपरी, ता. ३ ः दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून बारा लाख रुपये किमतीच्या एकूण बारा मोटारी, तीन ऑटो रिक्षा जप्‍त केल्‍या आहेत. पिंपरी-चिंचवड आणि परजिल्ह्यातून चोरी केलेली वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
राहुल शिवाजी राठोड, फारुक अन्सर पठाण व विशाल दिलीप करपते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे यांच्‍या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे व तपास पथकातील पोलिस अंमलदार आदींनी मिळून ही कारवाई केली.
चाकण पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार आरोपी वाहन घेऊन जात असल्‍याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यांची चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींनी चाकण, आळंदी, म्हाळुंगे एमआयडीसी, भोसरी, खोपोली, लोणावळा, सोलापूर, औरंगाबाद व अकोला जिल्ह्यातील पोलिस ठाणे येथून दुचाकी तसेच अॅटो रिक्षा चोरी केली असल्याची कबुली दिली. बारा लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी आणि तीन अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT