सोमाटणे, ता. ३ ः पवनमावळात शेतकरी वर्गाकडून बुधवारी (ता. २) सायंकाळी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. काळाच्या ओघात शेतीकामासाठी यांत्रिकीकरण सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडे असलेल्या बैलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मात्र, पवनमावळ पूर्व भागातील सोमाटणे, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, चांदखेड, आढले, कुसगाव, पाचाणे, पुसाणे परिसरात अद्याप ७० टक्के शेतकऱ्यांकडे बैल आहेत. ते ट्रॅक्टरसह बैलांकडूनही कसून शेती करत आहेत. त्यामुळे या भागात पूर्वापार अनेक पिढ्यांपासून बैलपोळा सण साजरा केला जातो. हा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांना गोड पुरण पोळीचा नैवेद्य देऊन सजवलेल्या बैलांची ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीची सांगता गावातील वेशीजवळ करण्यात आली. याबाबत प्रगतशील शेतकरी दिलीप राक्षे म्हणाले, ‘स्वयंचलित यंत्रामुळे बैलाचा वापर कमी झाला असून, अनेक शेतकरी बैल नसल्याने बैलपोळ्याला मातीच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करतात.
Smt३Sf६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.