पिंपरी-चिंचवड

वाकड, ताथवडेत रुजतेय मॉल संस्कृती

CD

पिंपरी, ता. ३ ः केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर आणि पुण्यातील बाणेर परिसराचा कायापालट झाला आहे. मात्र, त्यापेक्षा पुढचे पाऊल वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी परिसर टाकत आहे. गगनचुंबी निवासी गृहप्रकल्प उभे राहात आहेत. शैक्षणिक संस्था आहेत. आयटी पार्क व एमआयडीसीमुळे रोजगाराच्या संधी आहेत. त्यात आता मॉल संस्कृतीची भर पडली आहे. कारण, या भागांत विविध मॉल उभे राहिले आहेत. आणखी काही नियोजित आहेत.
मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग), मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम पट्ट्यातील उपनगरांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढली आहे. यात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी आणि लगतच्या गहुंजे, सोमाटणे, शिरगाव, हिंजवडी, माण, मारुंजी आदी गावांचा समावेश आहे. त्यातच हिंजवडी, माण, मारुंजीत पंचवीस वर्षांपूर्वी आयटी कंपन्या आल्या आणि रोजगाराची संधी उपलब्ध झाली. कामाच्या ठिकाणीजवळच निवासस्थान असावे, या संकल्पनेतून महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील गावांमध्ये विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित होऊ लागले. सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन अशी सेवा-सुविधा महापालिका पुरवत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोड या भागांपासूनच जात आहे. आता विविध सेवा कंपन्यांची दालने या भागांत आली आहेत. मोठमोठे मॉल्स आहेत. विविध कंपन्यांचे शोरूम आहेत. त्यामुळे, गृहपयोगी व दैनंदिन गरजेच्या वस्तू, साहित्य एकाच ठिकाणी मिळू लागल्या आहेत. त्यामुळे, नागरिकांनी या भागांत राहण्यासाठी पसंती दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात उभारलेल्या गृहप्रकल्पातील सर्वाधिक सदनिका विक्री होत असल्याचे खरेदी-विक्रीच्या आलेखावरून दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT