पिंपरी-चिंचवड

पुनावळे, ताथवडे, वाकडमधील रस्त्यांच्या विकास कामांना महापालिकेची मंजुरी

CD

पिंपरी, ता. ३ : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागांतील सुमारे ३४ किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यात येणार असून या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे, पीएमआरडी हद्दीतील मावळचा ग्रामीण भाग व हिंजवडी आयटी पार्कसोबत पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार असून नागरिकांना कायमस्वरुपी चांगले रस्ते उपलब्ध होणार आहेत.
जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे ‘ब’ आणि ‘ड’ प्रभागातील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागांतील सुमारे ३४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सेवा रस्त्यांसह सांगवडे व हिंजवडीला जोडणारा पूल, रावेत व किवळे भागात समीर लॉन्समागील रस्ता, विकासनगरमधील मुख्य रस्ता, पुनावळे भुयारी मार्ग ते काटे वस्ती ३० मीटरचा रस्ता, कोयते वस्ती चौक ते जांभेकडे जाणारा १८ मीटरचा रस्ता, वाकड मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड ते सिल्व्हर स्कूल हॉटेल रस्ता तसेच त्या भागातील विकास आराखड्यातील इतर रस्त्यांचा समावेश आहे. जलवाहिनी, जलनिस्सारण वाहिन्या, विद्युत वाहिन्या टाकूनच हे रस्ते कायमस्वरूपी विकसित केले जाणार आहेत.
याबाबत शंकर जगताप म्हणाले, ‘‘महापालिकेच्या विकास आराखड्यात असलेली चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्ते मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आधी हे रस्ते कोणते ? याची माहिती गोळा करून ते पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : महाकालेश्वर मंदिर परिसराच्या जवळ सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान विशाल शिवलिंग सापडले

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT