पिंपरी-चिंचवड

बारणे पुस्तिका संपादकीय

CD

प्रस्तावना...

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’... या महाराष्ट्र राज्यगीतात ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...’ अशी एक ओळ आहे. खरोखरच मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वीपासून मराठी माणसे आणि नेत्यांनी भारताच्या राजकीय जडण घडणीत नेतृत्व केले आहे. यातील सर्वांत अग्रभागी नाव म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचाच पराक्रम आणि पादाक्रांताने विश्वात नावलौकिक मिळवलेला प्रांत म्हणजे मावळ खोरे. या भागातील विद्यमान स्थितीत देशाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा अर्थात लोकसभेचा एक मतदारसंघ म्हणजे मावळ. या मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग दहा वर्षे संसदेत प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व आहे, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे.
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगावसारख्या उपनगरात सामाजिक कार्यात रमणारा एक युवक अशी बारणे यांची तीस वर्षांपूर्वी ओळख होती. शेतकरी कुटुंबातील मुलगा. सामाजिक कार्यातून राजकारणात येण्याचे ठरवितो आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपले राजकीय कार्य सुरू ठेवतो. महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून १९९७ मध्ये निवडून येतो. आपले वत्कृत्व आणि मनमिळावू स्वभावाच्या जोरावर सभागृहात वेगळा ठसा उमटवतो. विकासाच्या मुद्द्यावरून प्रशासन असो की, महापालिकेतील सत्ताधारी, त्यांना धारेवर धरून आपल्या प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करतो. त्यात त्यांना यशही येतं. प्रसंगी अनेकांशी मतभेद होतात. पण, मनभेद होऊ न देता पुन्हा कामाला लागतो. मतभेद केवळ तेवढ्या प्रसंगापुरतेच मर्यादित ठेऊन पुन्हा समाजकार्य आणि राजकारणाचा प्रवास सुरू राहतो. आपल्या कामाच्या जोरावर महापालिकेत सलग चार पंचवार्षिक निवडून येतो. या वीस वर्षांच्या कालावधीत विविध पदांवर काम सुरू राहते. कालांतराने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन बारणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चिंचवड विधानसभेची निवडणूक लढविली. त्यात अपयश आले. पण, त्यामुळे, खचून न जाता, काही झालेच नाही, अशा अर्विभावात कार्यकर्ते, चाहते व कुटुंबीयांशी वागून पुन्हा जोमाने कामाला लागतात. आपलं समाजकार्य सुरूच राहते. जोडीला राजकारण असतेच. त्यात त्यांना २०१४ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळते आणि त्यात मोठा विजय संपादन केला जातो. असा आप्पांचा चढता आलेख राहिला आहे. सलग दोन पंचवार्षिक मावळचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मतदारांनी दिली आहे. त्या संधीचे सोने करत खासदार बारणे यांनी सभागृहात सर्वाधिक उपस्थिती, सर्वाधिक प्रश्न विचारणे आणि सर्वाधिक खासगी विधेयक मांडत देशात ५४३ खासदारांमध्ये द्वितीय स्थान पटकावले आहे. आता ते तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या माध्यमातून ते मतदारांसमोर जाणार आहेत. त्यातच नुकतेच त्यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहे. एकसष्ठीत प्रवेश केला आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्वभाव आणि कार्याचे विविध पैलू त्यांचे सहकारी राजकीय नेते व समर्थकांनी विविध लेखांच्या माध्यमातून उलगडले आहेत. त्यांची खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याविषयीची भावना ‘संसदत्न श्रीरंग आप्पा’ या पुस्तकाच्या पानापानांतून प्रकट झाली आहे. हीच त्यांच्या नेतृत्वाची व स्वभावाची ताकद आहे. ती अधिक वृद्धिंगत होवो, याच शुभेच्छा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Paper Leak: पेपर लीक प्रकरणांचा निकाल आता अवघ्या ३ महिन्यांत! MP मध्ये स्थापन होणार ४ विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट!

Latest Marathi News Live Update : कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून संपविले जीवन; राळेगावमधील दुर्दैवी घटना

Mumbai News: मुंबईतील बेकरींवर एफडीएचा मोठा छापा; ६ परवाने निलंबित, ४ दुकाने बंद करण्याचे आदेश

अर्थबोध : ‘फायर’ एक सत्यकथा

IND vs ZIM, T20I: 'युवा खेळांडूंच्या ऊर्जेने...' श्रेयस अय्यरनं सांगितलं झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकाविजयाचं कारण

SCROLL FOR NEXT