पिंपरी-चिंचवड

‘युके’त शिक्षणासाठी जाताय ? सावधान ! अशा कात्रीत तुम्ही अडकू नका

सकाळ वृत्तसेवा

Things to Remember Before Study Abroad

अश्‍विनी पवार

पिंपरी : पदवीनंतर बहुतांश भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिका किंवा युके (युनायटेड किंगडम) ही दोन ठिकाणे निवडतात. मात्र, अमेरिकेच्या तुलनेने स्वस्त व सोयीचे असल्याने अनेकजण पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘युके’तील (युनायटेड किंगडम) विद्यापीठांचा पर्याय निवडतात. या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी कन्सल्टंट किंवा एजंटची मदत केली जाते. ‘युके’मधील नामांकित विद्यापीठात प्रवेश, पार्ट टाइम जॉब, शिक्षण पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीमध्ये नोकरी अशी अनेक आश्‍वासने ही एजंट मंडळी देतात. प्रत्यक्षात मात्र ‘युके’सारख्या ठिकाणी गेल्यावर भारतीय विद्यार्थ्यांना राहण्याचीही सोय केली जात नाही. विद्यापीठ व एजंट यांच्यातील संगनमतामुळे ‘युके’सारख्या ठिकाणी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊनही बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक कर्ज घेऊन, परदेशात गेल्याने परत येऊही शकत नाही व नोकरी नसल्याने परदेशात राहू देखील शकत नाही, अशा कात्रीत ही मंडळी अडकत आहेत.

उदा. १ :
अमित (नाव बदललेले आहे) या २७ वर्षीय तरुणाने पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ‘युके’तील कार्डिफ विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यासाठी शैक्षणिक कर्ज काढून, जवळपास २० लाख शुल्क भरले. अनेक गोष्टींबाबत त्याला विद्यापीठ व एजंटाकडून अंधारात ठेवण्यात आल्याने त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यापीठाकडून नोकरी तर मिळाली नाहीच. मात्र, परदेशी विद्यार्थी असल्याचे सांगत इतर प्रसारमाध्यमांनीही नोकरी देण्याचे टाळले. त्यामुळे उच्चशिक्षित असूनही हॉटेलमध्ये नोकरी करण्याची नामुष्की आकाशवर ओढवली. व्हिसा संपल्यामुळे अमितला भारतात परतावे लागले ते शिक्षणासाठी घेतलेला कर्जाचा डोंगर अंगावर घेऊनच.

उदा. २ :
अथर्व कुलकर्णी (नाव बदलले आहे) या २६ वर्षीय विद्यार्थ्याने देखील उच्चशिक्षणासाठी २०२२ मध्ये पिंपरी चिंचवडमधून वेल्स हे ठिकाण गाठले. शिकता शिकता मॅकडोनल्डस सारख्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी सुरू केली. मात्र अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच विद्यापीठातील शिक्षकांचा संप सुरू झाला. अथर्वला आपला निकाल जाणून घेण्यासाठी अनेकदा विद्यापीठाच्या वाऱ्या कराव्या लागल्या. प्लेसमेंट तर झालेच नाही.मात्र आपल्या क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला. परदेशी विद्यार्थी असल्याच्या कारणावरून अनेक कंपन्या अथर्वला नोकरी देण्यास नकार देत आहेत. एकीकडे परदेशात राहण्याचा भरमसाठ खर्च दुसरीकडे शिक्षणासाठी काढलेले कर्ज असा दुहेरी खर्च भागविण्यासाठी अथर्व सध्या उच्चशिक्षित असूनही रेस्टॉरंटमध्ये प्रतितास वेतनावर काम करत आहे. तर आपल्या क्षेत्रात काहीतरी संधी मिळेल या आशेवर फ्री लान्सिंग करत आहे.

अमित व अथर्व यांच्यासारखीच कथा युनायटेड किंगडम येथे शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची आहे. या देशातील अनेक नामवंत विद्यापीठांकडून परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ मोठी आश्‍वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांकडून स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट शुल्क घेतले जाते. मात्र याची काहीच कल्पना नसणारे विद्यार्थी डोळे मिटून परदेशी जातात. मात्र तिथे गेल्यावर परिस्थितीपुढे हतबल होऊन परत यावे लागते. काहीजण तिथेच लहानमोठी नोकरी करून अर्थार्जन करतात. मात्र, उमेदीची वर्षे शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यातच गेल्याने करिअरलाच ब्रेक लागल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

आपला पाल्य परदेशात शिक्षणासाठी गेला आहे. त्याचे करिअर आता चांगलेच होईल, अशी आशा या विद्यार्थ्यांच्या पालकांना लागलेली असते. दुसरीकडे हे विद्यार्थी मात्र तिथे रोज जगण्यासाठी नवीन संघर्ष करत असतात. आई वडील काळजी करतील म्हणून या अडचणी घरी सांगताही येत नाहीत आणि कर्ज घेऊन परदेशात आल्याने परत येताही येत नाही अशी येथे शिक्षणासाठी आलेल्या बहुतांश भारतीयांची अवस्था असल्याचे हे विद्यार्थी सांगतात.

‘‘मला ज्या विद्यापीठात प्रवेश मिळाला होता, ते नामांकित होते. मात्र कोणतेही मानांकन नसलेल्या व बनावट विद्यापीठाचे मार्केटिंगदेखील अनेक एजंटकडून केले जाते. या विद्यापीठात प्रवेश घेऊन फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचीही अनेक उदाहरणे ‘युके’मध्ये पहायला मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतानाच सर्व बाबी पडताळून घ्याव्यात.
- अमित, पीडित विद्यार्थी.

‘‘पुण्यात मी एका नामांकित विद्यापीठातून पदवी घेतली होती. मात्र, करियरच्या दृष्टीने ‘युके’मध्ये चांगली संधी मिळेल असे एजंटकडून मला सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अभ्यासक्रम संपूनही इथे अनेकांना नोकरी मिळत नाही. भारतीयांच्या बाबतीत येथे एक प्रकारचा भेदभाव केला जातो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.’
- अथर्व, पीडित विद्यार्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT