पिंपरी-चिंचवड

पवना नदीत शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

CD

सोमाटणे, ता.१२ ः गहुंजे येथे पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा शनिवारी सायंकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाऊस चालू असतानाच बचाव पथकाच्या तरुणांनी पाण्यात शोध घेऊन रात्री निखिलचा मृतदेहाला पाण्याबाहेर काढले.
निखील ओमप्रकाश यादव (वय १६ रा. देहूरोड) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील हा देहूरोड येथील सेंट जोसेफ
इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. सध्या शाळांना सुट्टी असल्याने तो शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी तो मित्रासमवेत गहुंजे येथे पवना नदीवर आला होता. तेथे पोहण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व त्याला चांगले पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती समजताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ, अपदा मित्र मंडळ व शिवदुर्ग मित्र मंडळच्या तरुणांनी पाऊस चालू असतानाच पाण्यात शोध घेऊन रात्री निखिलला पाण्याबाहेर काढले. त्याला उपचारासाठी पवना रुग्णालयात नेले असता तेथे उपचापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलिस हवालदार व्ही.एम.काळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT