पिंपरी-चिंचवड

पुनावळेकरांची मतदानाचीही वाट बिकट दोन ठिकाणी मतदान ः एका शाळेपर्यंत पोचायला रस्ताच नाही

CD

पिंपरी, ता. १३ ः मावळ लोकसभा मतदार संघातील पुनावळे भागात जवळपास बारा हजार मतदार आहेत. हा भाग देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेला आहे. मात्र, मतदानासाठी रस्त्याच्या पलीकडच्या नागरिकांना मात्र पुनावळे गावठाणात यावे लागले. या भागात श्रीमती अनुसया ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व दिलीपराव एकनाथ ढवळे प्राथमिक शाळा या दोन ठिकाणी मतदान केंद्र होते. मात्र यातील श्रीमती अनुसया ओव्हाळ माध्यमिक या केंद्रावर पोचण्यासाठी नागरिकांना बरीच कसरत करावी लागली
हे केंद्र मुख्य रस्त्यापासून आत गावठाणात होते. विशेष म्हणजे या शाळेपर्यंत पोचण्यासाठी अतिशय चिंचोळा रस्ता होता. हा रस्ताही काही ठिकाणी खराब असल्याने येथे दुचाकी किंवा चारचाकी नेता येत नव्हती. या भागातील बहुतांश नागरिक हे नव्याने स्थलांतरित झालेले असल्याने त्यांना या मतदान केंद्रांबाबत फारशी माहिती नव्हती. हे लक्षात घेऊन पक्षाचे कार्यकर्ते मुख्य रस्त्यावर आपले बूथ लावून येणाऱ्या नागरिकांना मतदार केंद्र कुठे आहे; याबाबत मार्गदर्शन करत होते. दुचाकी घेऊन आत गेलेल्या नागरिकांना पार्किंगसाठी जागा शोधावी लागत होती. शाळेला जोडणारा रस्ता हा वस्तीतून जात असल्याने व नुकत्याच झालेल्या पावसाने खराब झाल्याने येथे मतदान करण्यास येणाऱ्या नागरिकांची चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ratnagiri Airport : एकाच वेळी 4 विमाने होणार पार्क! 72 आसनी विमानांसाठी रत्नागिरीत 25 एकरवर कसं उभं राहतंय विमानतळ? DGCA च्या परवानगीबाबत समोर आली मोठी अपडेट

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

SCROLL FOR NEXT