पिंपरी-चिंचवड

अति घाई संकटात नेई

CD

पिंपरी, ता. १६ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या ग्रेडसेप्रेटरमध्ये अनेक पादचारी ‘शॉर्टकट’ घेण्यासाठी जोखीम पत्करतात. दूर अंतरावरचा वळसा वाचविण्यासाठी अथवा पुलावरून जाण्याचा त्रास टाळण्यासाठी ग्रेडसेप्रेटरमधील दुभाजकावर उड्या मारून हा मार्ग ओलांडतात. हा शॉर्टकट जिवावर बेतू शकतो याचे भानही पादचाऱ्यांना राहत नाही.

सुरळीत वाहतुकीसाठी निगडी ते दापोडी हा साडेबारा किलोमीटरचा रस्ता ग्रेडसेपरेटरमध्ये बनविण्यात आला आहे. मधोमध ग्रेडसेपरेटर असून बाजूला बीआरटी मार्गिका तसेच सेवा रस्ता आहे. ग्रेडसेपरेटरमधून वाहने वेगात जात असतात. हा मार्ग ओलांडण्यासाठी आकुर्डी, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी आदी ठिकाणी भुयारी मार्ग तसेच पादचारी पूलही उभारण्यात आले आहेत. यासह ठिकठिकाणी मोठे चौकही आहेत. मात्र, तरीही अनेक पादचारी काही अंतरावरून पायी चालत जाणे टाळण्यासाठी तसेच पादचारी पुलाच्या पायऱ्या चढणे व उतरणे टाळण्यासाठी जीवघेणा शॉर्टकट घेतात. ग्रेडसेपरेटरच्या दुभाजकावरून उड्या मारून रस्ता ओलांडतात. दरम्यान, या मार्गावर वाहने वेगात असल्याने अचानक समोर येणाऱ्या व्यक्तींचा त्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालकही गोंधळतात. अशामुळे अपघाताच्या घटना घडतात.
---------------------
तीन फूट उंचीच्या जाळीवरून उड्या
पादचारी जोखीम पत्करून दुभाजकावरून उड्या घेत रस्ता ओलांडत असल्याने असे प्रकार टाळण्यासाठी ठिकठिकाणी दुभाजकावर तीन फूट उंचीच्या लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. तरीही काहीजण या जाळीवरूनही उड्या घेत असल्याचे चित्र एम्पायर इस्टेट परिसरात नेहमी दिसते. विशेष म्हणजे येथे पादचारी पूल असतानाही अनेक पादचारी या पुलाचा वापर न करता धोका पत्करतात.
--------------------
पायी प्रवास
रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी अथवा बस थांब्यावर जाण्यासाठी अनेकजण सेवा रस्त्याने न जाता ग्रेडसेपरेटरमधून पायी प्रवास करतात. थोडे अंतर चालणे टाळण्यासाठी धोकादायकरीत्या ग्रेडसेपरेटरमधून प्रवास करतात. अनेकदा वाहनचालक त्यांना वाहन थांबवून बाहेरून जाण्यास सांगतात.
-------------------------
‘‘रस्ता ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग, पादचारी पूल उभारलेले असून, हे नागरिकांच्या सोयीसाठीच आहे. त्याचा वापर करणेही गरजेचे आहे. मात्र, तरीही थोडा वेळ वाचविण्याच्या नादात तसेच पायी चालण्याचा त्रास वाचविण्यासाठी जोखीम पत्करून रस्ता ओलांडणे चुकीचे आहे. यामुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.’’
- विकास पागिरे, नागरिक

‘‘दुभाजकावरून धोकादायकरीत्या नागरिकांनी उड्या मारू नयेत. यासाठी ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणच्या जाळ्या तोडण्यात आल्या असून, येथूनच उडी घेत काहीजण धोकादायकरीत्या रस्ता ओलांडतात. नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या जाळ्यांचे नुकसान करणे योग्य नाही.’’
- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक नियोजन विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT