पिंपरी-चिंचवड

ऑल स्टार्स अकादमीला विजेतेपद

CD

पिंपरी, ता. ३० ः आर्या जांभुळकर, अद्विका जाधव यांची फलंदाजी तर समर्थ साठे याच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर यजमान ऑल स्टार्स अकादमीने १३ वर्षांखालील ‘ऑल स्टार्स’ चषक पटकाविला. गोलंदाज समर्थ साठे सामनावीर ठरला.
ऑल स्टार्स अकादमीच्यावतीने, चिखली येथे वरील स्पर्धा भरविण्यात आली. स्पर्धेचा अंतिम सामना व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि यजमान ऑल स्टार्स अकादमी यांच्यात झाला. त्यामध्ये यजमान संघाने २२ धावांनी विजय मिळविला. आर्या जांभुळकरने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर अद्विका जाधव हिने संघासाठी उपयुक्त खेळी केली. गोलंदाजीत समर्थ साठे आणि कर्णधार विहान राजनाळे यांनी चांगली गोलंदाजी केली. पराभूत संघाकडून ध्रुव पवार, अर्णव अहेर, सुधाकर राठोड यांनी चांगला मारा करुन यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मात्र, व्हेरॉक-वेंगसरकर संघाची फलंदाजी १८२ धावांवरच आटोपली.
विजेत्या संघाची अद्विका जाधव स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ठरली. याच संघाचा दर्श लोलाडिया याला सर्वोत्तम गोलंदाज तर सिद्धांत लादे (व्हेरॉक-वेंगसरकर अकादमी) याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या किताबाने गौरविण्यात आले. सुधाकर राठोड (व्हेरॉक-वेंगसरकर अकादमी) स्पर्धेतील सर्वोत्तम मानकरी खेळाडू ठरला.
संक्षिप्त धावफलक ः
ऑल स्टार्स ः ४५ षटकांत सर्वबाद २०४ - आर्या जांभुळकर ४७, अद्विका जाधव ३४, विहान राजनाळे २५ (ध्रुव पवार ३/३०, अर्णव अहेर ३/२७, सुधाकर राठोड २/२८) वि.वि. व्हेरॉक-वेंगसरकर अकादमी ः ४५ षटकांत १० बाद १८२ - स्वराज सातपुते ३१, श्रेयान पारवे २८ (समर्थ साठे ३/३८, विहान राजनाळे २/४५)
PNE24U16840

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT