पिंपरी-चिंचवड

चित्रकला शिक्षणासाठी वायाळ यांची धडपड

CD

सोमाटणे, ता. ३ ः चित्रकलेतून चांगल्या आर्थार्जन व्यवसायकडे विद्यार्थी वळविण्यासाठी, संसाराचा गाडा एकटीने ओढणाऱ्या स्वाती वायाळ-कडू यांची धडपड सुरू आहे.

गेल्या काही वर्षात संगणक युग आल्याने चित्रकलेकडे पाहण्याचा पालक, विद्यार्थ्यांचा दृष्टीकोण बदलत चालला असून, मुलांना आवश्यक असणाऱ्या चित्रकलेचे ज्ञान संगणकातून मिळते, अशी सर्वच पालकांची धारणा झाली आहे. पालक व विद्यार्थ्यांच्या या गैरसमजुतीला फाटा देण्यासाठी स्वाती वायाळ यांनी जनजागृतीला सुरुवात केली आहे.

चित्रकला क्षेत्रात पारंगत असलेल्या व पिंपरी-चिचंवड येथे प्रिंटींग प्रेसमध्ये डिझायनरचे काम करणाऱ्या वायाळ यांनी पतीच्या निधनानंतर परिसरातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण काहीतरी करायचे असा निर्धार केला. एकटीने संसाराचा गाडा ओढत, खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी आपण कलेच्या माध्यमातून विकास करायचा, या उद्देशाने त्या पिंपरी-चिंचवड शहरातून ग्रामीण भागातील सोमाटणे येथे निवासी झाल्या. सध्या नोकरी सांभाळून उरलेल्या वेळेत चित्रकलेतून विद्यार्थ्यांचे करिअर याविषयी विनामूल्य प्रबोधन करतात. विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, यासाठी स्वखर्चाने सोमाटणे परिसरातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा घेतात. उत्कृष्ट चित्रासाठी विशेष पारितोषिक, प्रशिस्तपत्रक देणे आदी उपक्रम करतात.

चित्रकला ही केवळ चित्र काढून दुसऱ्याला दाखवण्यासाठी नसून चित्रकलेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडले जात असून, चांगल्या उत्पन्नाचा मार्ग मिळतो. नोकरी किंवा व्यवसाय सहज करता येतो. यात आयटी विभाग, डिझायनर, अॅडव्हरटायझ, प्रिंटींग, फिल्म इंडस्ट्री आदी विभागात चांगल्या आर्टिस्टची मागणी असते. हे आर्टीस्ट चित्रकलेच्या विकासातूनच तयार होत असून, भविष्यात चांगल्या आर्थर्जनाचा हा मार्ग आहे. कमी भांडवलात अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय या कलेतून तरुणांना सहज करता येत असल्याने मुलांनी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Smt३Sf१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : नाशिक–संभाजीनगर महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर पलटी; दीड तास वाहतूक ठप्प

Kolhapur Election : एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई करा! राजू शेट्टींचा सरकारवर थेट हल्लाबोल

Cold wave alert: कडाक्याची थंडी वाढली, आरोग्याची घ्या काळजी! आरोग्य विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT