सोमाटणे, ता. २७ ः घोरावडेश्वर डोंगरावर रानफुले बहरली असून, त्यामुळे भाविक व पर्यटकांचा सेल्फी काढण्यासाठी गर्दी वाढली आहे. दरवर्षी घोरावडेश्वर डोंगरावर नवरात्रात रानफुलांना बहर येतो. तो महिनाभर राहतो. त्यानंतर पाऊस कमी झाल्यावर ती फुले गळून पडतात. परंतु, यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यातच दमदार पावसाने हजेरी लावली. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर आणखी वाढला. परिणामी, सध्या संपूर्ण घोरावडेश्वर डोंगरावर विविध जातीच्या रानफुलांना बहर आला असून, ती संततधार पावसाने नेहमीपेक्षा अधिक काळ टिकणार आहेत. फुलांना लवकर बहर आल्याने दर्शनासाठी आलेले भाविक व पर्यटकांचे पाऊल आता रानफुलांकडे वळले आहे.
PNE24U41131
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.