पिंपरी-चिंचवड

टाटा मोटर्स ई ११/१२ प्रेस शॉपकडून घोरावडेश्वरच्या महादेवाला अभिषेक

CD

पिंपरी, ता. २७ ः श्रावण महिन्यानिमित्त टाटा मोटर्स कंपनीच्या ई ११/१२ प्रेस शॉपद्वारे घोरावडेश्वर डोंगरावरील शंभू महादेवाला पूजा आणि अभिषेक करण्यात आला. यावेळी भजन, प्रवचन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, महाप्रसादाचे वाटप उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाले.
गेली १९ वर्षे हा उपक्रम अखंडितपणे घोरावडेश्वर येथे हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये ई ब्लॉक मधील सर्व कर्मचारी व कामगार संघटना प्रतिनिधी यांचे मोठे योगदान असते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डोंगरावर धर्मशाळेत राहून गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा याचा अभ्यास करणाऱ्या सात विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तु व कपडे मदत तसेच तळेगावमधील अंध व्यक्ती सोमनाथ लांडे यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच ३०० लोकांना अन्नदान करण्यात आले. याशिवाय, डोंगरावर आत्तापर्यंत २०० झाडे लावण्यात आली आहेत. शशिकांत पाटील यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. राजेंद्र उभे यांनी आभार मानले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती म्हसे, भूषण सूर्यवंशी, सुरेश पाटील, सचिन टेकवडे, दत्ता भालेराव, सुदाम पाटील, पांडुरंग पाटील, अशोक काळोखे, किरण बोरगे, सनंदन वाघमोडे, पंजाब देशमुख, कामगार संघटनेचे प्रतिनिधी औदुंबर गणेशकर, सुभाष हुलावळे, शाम घावटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
PNE24U41160

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Municipal Elections : काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार? ; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे संकेत!

तो घाबरला अन् गोंधळला! वियान मुल्डरवर लाराचा ४०० धावांना विक्रम न मोडल्याने Chris Gayle भडकला

सत्यभामा! सती परंपरेला बळी पडलेल्या निष्पाप स्त्रियांची गाथा, निस्सीम प्रेमाच्या त्यागाची कहाणी, पोस्टर पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

Nashik Crime : सिडकोत भरदिवसा वृद्धाची हत्या; लाकडी दांडक्याने डोक्यात वार

Ulhasnagar News : उल्हासनगरात चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती; धीरज चव्हाण यांनी पदभार स्विकारला

SCROLL FOR NEXT